India Squad for Sri Lanka tour: गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच (Gautam Gambhir) होताच आता पहिल्याच दौऱ्यात मोठे निर्णय घेतले आहेत. गंभीरने या पाच खेळाडूंना मोठा धक्का दिलाय.
झिम्बॉब्वे दौऱ्यात टी-ट्वेंटीमध्ये शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माला श्रीलंका दौऱ्यात संधी न मिळाल्याने क्रिडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
ऋतुराज गायकवाड याने मागील 7 डावात 71.2 सरासरी आणि 158.7 स्ट्राइक रेटने धावा कुटल्या आहेत. अशातच ऋतुराजला देखील संघात संधी मिळाली नाहीये.
गेल्या अनेक वर्षांपासून संधीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या संजू सॅमसनला टीम इंडियाच्या वनडे संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे गंभीरच्या निर्णयावर टीका होत आहे.
रोहित शर्मानंतर वनडे संघाची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, श्रीलंका दौऱ्यात त्याला व्हाईस कॅप्टन्सी देखील दिली नाही. शुभमनच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीये.
हार्दिक पांड्या याला बीसीसीआयच्या निर्णयाने मोठा धक्का बसलाय. पांड्याला टी-ट्वेंटी आणि वनडेची व्हाईस कॅप्टन्सी देखील देण्यात आली नाही. त्यामुळे पांड्याला मोठा धक्का बसला आहे.