बीसीसीआयशी पंगा घेणं श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना महागात पडलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंना बीसीसीआयने करार यादीतून डावललं आहे.
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचा वार्षिक करारासाठी विचार केला गेला नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितलं आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या सेंट्रल कॉन्ट्राक्ट यादीत देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या करारबद्ध खेळाडूना सज्जड दम दिलाय.
बीसीसीआयच्या करारामध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व नसताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास प्राधान्य द्यावं, असं स्पष्ट शब्दात बीसीसीआयने सांगितलं आहे.
A+ ग्रेडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंची नावं आहेत. या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी मिळतील.
रविचंद्रन अश्विन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांचा ग्रेड A मध्ये समावेश करण्यात आलाय.
तर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल यांना ग्रेड बी खेळाडूंना यंदाच्या वर्षी 1 कोटी दिले जाणार आहेत.
तर रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार या खेळाडूंना या वर्षी बीसीसीआयकडून खेळण्यासाठी प्रत्येकी 3 कोटी मिळतील.