BCCI On Domestic Cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इकडे बीसीसीआयने रोहितसेनेचं जल्लोषात स्वागत केलं. आता वर्ल्ड कप विजेत्यांचे लाड संपले आहेत.
वर्ल्ड कप जिंकून पांधरवडा झाला तरी देखील चाहत्यांच्या मनातील आनंद अजूनही कमी झाला नाही. अशातच खेळाडूंचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.
अशातच आता बीसीसीआयने 'पुरे झाले लाड' म्हणत खेळाडूंनी पुन्हा मैदानात येण्याचं आवाहन केलंय. बीसीसीआयने वर्ल्ड कप विनर खेळाडूंना आदेश दिले आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड कप टीममधील स्टार क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध करून द्यावं, अशी बीसीसीआयची इच्छा आहे.
बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना सुट दिली आहे. त्यांची इच्छा असेल तर ते स्वत: निर्णय घेतली, असं बीसीसीआयने ठरवलंय.
दरम्यान, टीम इंडियामधील सिनियर खेळाडूंना आराम दिल्याने आता युवा खेळाडूंची खरी परीक्षा सुरू झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.