जर तुम्ही twitter वर एक्टिव आहात तर सतर्क राहण्याची गरज आहे. तुमची एक छोटीशी चुक तुमचं अकाउंट ब्लॉक करु शकते. Twitter ने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात निष्काळजीपणा चालणार नाही.
Twitter ने माहिती दिली आहे की कोणत्याही यूजरने कोरोना वॅक्सीन बद्दल कोणतीही अफवा पसरवली तर त्यांचं अकाउंट बंद केलं जाईल आणि तो युजर पुन्हा Twitter अकाउंट वापरु शकणार नाही.
मायक्रोब्लॉगिंग अॅप Twitter ने स्पष्ट केलं आहे की पहिल्यांदा वॅक्सीनबाबत कोणीही चुकीची माहिती दिली तर त्या युजरला आधी सुचना दिली जाईल पण दुसऱ्यांदा चूक केली तर 12 तासांसाठी त्याचं अकाऊंट लॉक केलं जाईल. वारंवार चूक करणाऱ्या व्यक्तीचं अकाऊंट कायमचं बंद केलं जाईल.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोना वॅक्सीनबाबत अफवा पसवणऱ्या 8400 यूजरचे Twitter अकाउंट बंद केले गेले आहेत.
Twitter ने सांगितले आहे की, नवीन नियम सर्व भाषांसाठी लागू असणार आहे. याची सुरुवात इंग्रजी भाषेत अफवाह पसरवणाऱ्यां युजर्सकडून करण्यात आलीये. यानंतर सर्व भाषांवर नियम लागू होणार आहेत.