Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला...
विराट आणि अनुष्का सध्या ऋषीकेश येथे आहेत. लेक वामिकासोबत ही सेलिब्रिटी जोडी सध्या येथील आध्यात्मिक वातावरणात तल्लिम झाल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी दयानंद आश्रम इथं ही जोडी पोहोचली.
मंगळवारी ही जोडी आश्रमात अनुष्ठान करेल असं सांगण्यात आलं आहे. आश्रमाचे जनसंपर्क अधिकारी गुणानंद रयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं विराट आणि अनुष्कानं ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
विराट आणि अनुष्का याआधी वृंदावनात गेले होते. ऋषीकेशशीसुद्धा त्यांचं खास नातं जोडलं गेलं आहे.
9 फेब्रुवारीला विराट ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेमध्ये संघाकडून खेळणार आहे. तत्पूर्वी त्यानं आध्यात्मिक मार्गानं चिंतन केल्याचं पाहायला मिळत आहे.