Mukesh Ambani birthday : मुकेश अंबानींबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचं प्रचंड साम्राज्य, जगातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जावधींची संपत्ती याविषयी चर्चा होताना दिसते. अशातच आज मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे.
अंबानी कुटूंबियांच्या संपत्तीविषयी अनेक दावे केले जातात. अनेक रिपोर्ट देखील समोर येतात. मात्र, अनेक वर्षांची मेहनत आणि स्वभावातील साधेपणा हे अंबानी कुटुंबाचं वैशिष्ठ्य मानलं जातं.
मुकेश अंबानी यांच्या यशामागे त्यांची पत्नी निता अंबानी यांचा मोठा हात आहे. तीन आठवड्यांच्या प्रेमसंबंधानंतर नीता आणि मुकेश यांनी 1985 मध्ये लग्न केलं होतं.
मात्र, निता अंबानी लग्नाआधी काय करायच्या? याची माहिती खुप कमी जणांना माहित आहे. मुकेश अंबानींसोबत लग्नाआधी निता यांची कारकीर्द शाळेतील शिक्षिका म्हणून सुरू झाली.
सनफ्लॉवर नर्सरीमध्ये 800 रुपये दरमहा माफक पगारावर त्यांनी करियरची सुरूवात केली होती. अंबानी कुटुंबात लग्न झाल्यानंतरही निता अंबानी यांनी अनेक वर्षे शिक्षिका म्हणून काम सुरू ठेवलं.
निता अंबानी यांनी नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. लग्नाआधी त्यांनी शिक्षिका म्हणून काम करू द्यावं, अशी अटच ठेवली होती.
अनेक वर्ष घर आणि इतर जबाबदाराऱ्या पार पाडल्यानंतर 2014 मध्ये नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात रुजू झाल्या होत्या.
दरम्यान, मोठी जबाबदारी आल्यानंतर देखील निता अंबानी यांनी रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली अन् मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला. जामनगर, सुरत, वडोदरा, दहेज, लोधीवली, नागोठणे, नागपूर आणि नवी मुंबई या ठिकाणी त्यांनी शाळा देखील उभ्या केल्या.