Best tourist place near pune : विकेंडचा प्लान करताय? कशाला लांबची ठिकाणं शोधता...? किमान प्रवास आणि कमाल विश्रांती, सोबतच मज्जामस्तीसाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या...
Best tourist place near pune : आठवडी सुट्टीच्या दिवशी अनेकांचीच पावलं कुठंतरी निवांत क्षण व्यतीत करण्याच्या दिशेनं वळतात. मग शोधाशोध सुरू होते ती काही कमी गर्दीच्या ठिकाणांची. शहरी धकाधकीपासून दूर असणाऱ्या एखाद्या जागेची.
दैनंदिन जीवनातील काही साचेबद्ध गोष्टींपासून दूर राहत सुट्टीच्या निमित्तानं स्वत:ला वेळ देण्यासाठी मुंबईकरांचा पर्याय पुण्यानजीकच्या काही ठिकाणांना असतो.
ही ठिकाणं प्रत्येक ऋतूत सुंदर असता. मात्र पावसाळ्यात तर त्यांची एक वेगळीच लकाकी पाहायला मिळते. अशा या ठिकाणांच्या यादीत असणाऱ्या जागा हिमाचललाही टक्कर देतील अशा.
मुंबई, नवी मुंबई आणि पुणेकरांसाठी लोणावरा हा एक उत्तम विकेंडचा पर्याय आहे. इथं पावसाळ्यात प्रवाहित होणारे असंख्य लहानमोठे धबधबे, ट्रेक आणि ट्रेल पर्यटकांचं मन धरुन ठेवतात.
महाबळेश्वरप्रमाणंच पाचगणीसुद्धा पुण्यापासून काही तासांच्याच अंतरावर. इथून दिसणारा निसर्ग शब्दांतही वर्णन करता येणार नाही इतका कमाल. शिवाय इथं मिळणारे राहण्याचे पर्यायही मन जिंकणारे.
महाराष्ट्रातील लोकप्रिय गिरीस्थानांपैकी एक असणारं महाबळेश्वर हेसुद्धा या यादीत येतं. सुरेख घाटांची वाट, हिरवा निसर्ग आणि धुक्याची चादर, सोबतीला बोचरी थंडी यामुळं महाबळेश्वरही एक उत्तम पर्याय.
पुण्यापासून जवळ असणारं आणखी एक ठिकाण म्हणजे माथेरान. आशिया खंडातील हे एकमात्र कारमुक्त गिरीस्थान आहे. लाल माती, हिरवीगार वनराई आणि सतत खुणावणारा निसर्ग ही या गिरीस्थानाची जमेची बाजू.
विशेष म्हणजे पावसाळ्यात अनेकांनाच खुणावणारं आणि पुण्याच्याही नजीक असणारं एक ठिकाण म्हणजे कर्जत. बरेच व्हिला आणि रिसॉर्ट इथं मुक्कामासाठीचे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध करून देतात.