best hollywood horror movie : ओटीटीवरही भयपटांना कमाल पसंती मिळताना दिसत असल्यामुळं सध्या याच चित्रपटांबाबत इंटरनेटवर भलतीच हवा पाहायला मिळत आहे.
best hollywood horror movie ott : सुट्टीच्या दिवशी एखादा कमाल चित्रपट पाहून घरच्या घरीच चित्रपटाचं अनोखं स्क्रीनिंग करण्याकडे अनेकांचा कल असतो.
घरातच माहोल करत चित्रपट पाहण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी काही कमाल कलाकृतींची यादी सोशल मीडियावर सिनेप्रेमी सातत्यानं शेअर करत असतात. अशाच यादीतून एका भयपटाचं नाव सातत्यानं समोर आलं आहे.
आतापर्यंतचा सर्वात जास्त धडकी भरवणारा चित्रपट अशी ओळख असणारा आणि मिनिटामिनिटाला थरकाप उडवणारा हा चित्रपट एकट्यात न पाहिलेलाच बरा.
2012 मध्ये प्रदर्शित झालेला आणि आणि स्कॉट डेरिकसनच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेला हा चित्रपट आहे, 'सिनिस्टर'. एथन हॉक, जूलियट रेलांस, फ्रेड थॉम्पसन, जेम्स रॅन्सोन, क्लेयर फोले या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.
या चित्रपटाचं कथानक एका लेखकाच्या अवतीभोवती फिरतं, जो सत्यघटनांवर आधारित लिखाण करत असतो. एका अतिशय जुनाट आणि निर्मनुष्य घरात जाऊन हा लेखक आणि त्याचं कुटुंब गेलं असता तिथं त्यांना काही जुन्या फिल्म फुटेज मिळतात आणि काही नकारात्मक शक्तींचा वास असल्याची माहितीसुद्धा मिळते.
या चित्रपटामध्ये अशी काही दृश्य़ आहेत जी पाहिल्यानंतर कोणालाही याचा विसर पडणार नाही.
इतकंच काय, तर एकट्यानं दार उघडायचीसुद्धा भीतीच वाटेल. काय मग... तुम्ही कधी आखताय हा चित्रपट पाहण्याचा बेत?