तुम्हाला तुमचा हनिमून वेगळा आणि आठवणीत राहील असा करायचा असेल तर तुमच्यासाठी रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन जाणून घेऊया.
Honeymoon Destinations: लग्नानंतर कुठेतरी दूर जाऊन फिल्मी स्टाईल हनीमून करावी अशी अनेक कपल्सची इच्छा असते. हनीमून हे प्रत्येकाला खास बनवायचे असते. त्यासाठी नयनरम्य ठिकाण शोधण्याकडे कपल्सचे लक्ष असते.
हनीमून म्हटलं की प्रत्येकजण शिमला-मनाली आणि राजस्थानला जातो. पण तुम्हाला तुमचा हनिमून वेगळा आणि आठवणीत राहील असा करायचा असेल तर तुमच्यासाठी रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन जाणून घेऊया.
सिक्कीमच्या उत्तरेकडील भागात असलेले हे ठिकाण तुमचा हनिमून खरोखरच संस्मरणीय बनवेल. थांगू दरी 3950 मीटरवर वसलेली असून तिची उंची 13000 फूट आहे. ही दरी तुम्हाला गुरुडोंगमार तलाव आणि चोपता तलावाच्या वाटेवर दिसेल. ऑक्टोबर ते मार्च महिन्यात या ठिकाणाचे दृश्य स्वर्गासारखे वाटते.
पहाटे पहाटे डोंगरावरून पांढर्या शुभ्र बर्फाच्या डोंगराकडे पाहिल्यावर आपण स्वप्न पाहत असल्याचा भास होतो. हे ठिकाण चीनच्या सीमेजवळ आहे. येथे फक्त भारतीयांनाच जाण्याची परवानगी आहे. येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चोपटा गावात जाता येते. थंगू व्हॅलीमध्ये वर गेल्यावर तुम्हाला झाडांच्या रांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळेल.
तवांग हे हिमालयात वसलेले एक छोटेसे शहर आहे आणि हे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. हे शहर तवांग मठाचे घर आहे, भारतातील सर्वात मोठा मठ आणि सहाव्या दलाई लामा यांचे जन्मस्थान देखील आहे. हिवाळ्यात तवांगला भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो. अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूटसाठी हे लोकेशन निवडतात.
नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर पर्यटकांना खूप आकर्षित करतो. जर तुम्ही हनिमूनसाठी इथे जात असाल तर तुम्ही गोरीचेन पीक, सेला पास, तवांग मठ, नुरनांग धबधबा यांसारख्या ठिकाणांना जरूर भेट द्या.
हनिमूनसाठी यापेक्षा चांगली जागा कोणती असू शकते? शाहरुख आणि गौरी खाननेही या ठिकाणी त्यांचा हनीमून दार्जिलिंगमध्ये साजरा केल्याचे सांगितले जाते. तुम्हाला तुमचा हनिमून शिमला-मनालीच्या पर्वतांव्यतिरिक्त एखाद्या खास ठिकाणी साजरा करायचा असेल तर तुम्ही दार्जिलिंगला जाण्याचा प्लॅन करू शकता.
हनिमूनसाठी थंडीचा काळ उत्तम मानला जातो. दार्जिलिंगचे हवामान खास करुन थंडीच्या दिवसात पाहण्यासारखे आहे. दार्जिलिंगचे सर्वोच्च शिखर 'टायगर हिल' हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्यायला हवी.