Entertainment News : शैतान, मुंज्या, भुलभूलैय्या हे सर्व चित्रपट याच्यापुढे पानीकम.... पाहा 2024 गाजवणारा हा भयपट कोणता...
साहसपट असो किंवा प्रेमकथांसह असणारी सांगड. यंदाच्या वर्षी विविध धाटणीच्या चित्रपटांना कमाल लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चित्रपटांचे प्रकार आणि कथानक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले.
या साऱ्यामध्ये एक असा चित्रपटही होता, ज्याचा निर्मितीखर्च फार नसतानाही या चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता इतकी कमाल होती की OTT वर सर्वाधिक चांगली रेटिंग मिळालेल्या चित्रपटाच्या श्रेणीतही तो गणला गेला.
बहुतांश किंबहुना प्रत्येक दृश्याच्यावेळी किंकाळी फोडायला लावणारा हा चित्रपट होता डेमी मूर स्टारर 'द सब्स्टन्स' (The Substance). Coralie Fargeat दिग्दर्शित या चित्रपटामध्ये मार्गरेट क्वाले आणि डेनिस क्वेड सहाय्यक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात.
एका अभिनेत्रीभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं जिच्या कारकिर्दीचा उतरता आलेख सुरू असून, चिरतरुण दिसण्यासाठी ती तात्पुरत्या स्वरुपात black-market drug चा वापर करते.
पुढं याच ड्रगचा तिच्या शरीरावर विपरित परिणाम होण्यास सुरुवात होते. 77 व्या कान चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटानं जगभरात 2,849,847,651 रुपये अर्थात 34.1 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी कमाई केली, आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचा निर्मिती खर्च 17.5 मिलियन डॉलर असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यानं 100 टक्के नफा कमवला.
अनेक तगड्या चित्रपटांचं आव्हान असूनही 'द सब्स्टन्स'नं मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणं सुरूच ठेवलं. सौंदर्य, तारुण्य आणि या साऱ्याचा सध्याच्या पिढीशी असणारा थेट संबंध असणारं कथानक ही या कथानकाची जमेची बाजू ठरली.
IMDB नं या चित्रपटाला 10 पैकी 7.4 इतकी रेटिंग दिली असून, जर तुम्हीही चित्रपटप्रेमी असाल आणि ही कलाकृती अद्याप पाहिली नसेल तर वर्ष संपायच्या आत हा भयपट नक्की पाहा.