PHOTOS

बायको असो वा गर्लफ्रेंड, 'या' ठिकाणी एकत्र फिरल्याशिवाय मान्सून अधूरा!

भारतातील या रोमँटिक ठिकाणी पावसाळ्यात प्रत्येक कपल्सने भेट दिलीच पाहिजे. 

Advertisement
1/8

भारतात पावसाळा ऋतू हा अत्यंत आनंददायक मानला जातो. या ऋतूमध्ये फक्त उन्हापासूनच आराम मिळत नाही, तर हवेत एक वेगळीच रोमँटिकपणा जाणवतो. म्हणून या ऋतूला प्रेमाचा ऋतू असे म्हटलं जात. 

2/8

जर तुम्हाला देखील बायको किंवा गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचं असेल तर तुम्ही भारतातील या प्रसिद्ध ठिकाणी फिरू शकता. जाणून घ्या सविस्तर 

3/8

केरळमधील मुन्नार हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे चहाचे हिरवेगार मळे, धुक्याने भरलेल्या डोंगररांगा आणि धबधबे हे तुम्हाला प्रचंड आकर्षित करतात. येथे स्वर्गासारखं वातावरण आहे. 

4/8

ऊटी हे कपल्ससाठी एक अतिशय चांगलं ठिकाण आहे. शांत सरोवरे, बॉटनिकल गार्डन्स आणि नीलगिरी पर्वतरांगांच्या सान्निध्यात ऊटी खूपच सुंदर दिसते. 

5/8

त्यासोबत पावसाळ्यात गोवा हे कपल्ससाठी एक खास ठिकाण आहे. कारण पावसाळ्यात गर्दी कमी असते. त्यामुळे तुम्ही समुद्रकिनारी शांत वेळ घालवू शकता. 

6/8

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे फिरणं म्हणजे एक जिवंत चित्रपटाचा अनुभव येतो. 

7/8

मेघालयातील शिलाँग हे पावसाळ्यातील एक सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे अनेक धबधबे, हिरव्या टेकड्या आणि शांत वातावरण हे तुम्हाला आकर्षित करते. 

8/8

जोडीदारासोबत तुम्ही वरील दिलेल्या ठिकाणी मनसोक्त, शांततेत आणि प्रेमळ वातावरणात वेळ घालवू शकता.





Read More