PHOTOS

जागतिक महिला दिनामिनित्त आपल्या जवळच्या 'ती' ला हे 1000 रुपयांपर्यंतच खास गिफ्ट

Best Womens Day Gifts Ideas Under 1000: आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या महिलेला खास गिफ्ट द्यायचं असेल तर खालील पर्यांयाचा नक्की विचार करा. 

Advertisement
1/8
बॉडी स्क्रब
बॉडी स्क्रब

या किटमध्ये एक कॉफी बॉडी स्क्रब आहे. कॉफी बॉडी पॉलिशिंग तेल, लाकडाचा मसाजर आणि लाकडाचा चमचा असं या किटमध्ये आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे खास गिफ्ट देऊ शकता. 

2/8
साडी
साडी

साडी हा प्रत्येक महिलाच्या आवडती गोष्ट आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी खास रंगाची साडी खरेदी करू शकता. यासाठी तुम्ही खास साडी निवडू शकता. यामध्ये गार्डनच्या साडी, सिल्क साडी, कांजिवरम साडी किंवा अगदी कॉटनच्या साड्यांचा देखील विचार करु शकता. 

3/8
बॅग
बॅग

महिला दिवस 2024 च्या निमित्ताने खास हँड बॅगेचा विचार करु शकता. ज्यामध्ये टो बॅग, हँडबॅग, लॅपटॉप बॅग. तसेच जर ही महिला प्रवास करत असेल तर ट्रॅव्हल बॅग देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. 1000 रुपयांपर्यंतचा हा पर्याय अतिशय उत्तम आहे. 

4/8
स्मार्ट वॉच
स्मार्ट वॉच

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना स्मार्ट वॉच हा उत्तम पर्याय आहे. अशावेळी तुम्ही त्या महिलेची किती काळजी करता याची कल्पना देखील येऊ शकते. आताच्या स्मार्ट वॉचमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. यामध्ये तुम्ही किती पाऊले चाललात, किती कॅलरीज कमी केलीत यासारखे ऑप्शन्स देखील असतात. 

5/8
झाडे
झाडे

छोटी रोपटी मग ती इन डोअर किंवा आऊट डोअर असो, महिलांना झाडे ही आवडतात. अशावेळी त्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश करु शकता. तसेच महिलांना झाडे ठेवायला तुम्ही प्लँट सँडचा देखील विचार करु शकता. या गोष्टी हजार रुपयात नक्कीच उपलब्ध होतील. 

6/8
फुल बॉडी मसाजर
फुल बॉडी मसाजर

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 मध्ये आवडत्या महिलेला फुल बॉडी मसाजर गिफ्ट म्हणून देऊ शकता. यासाठी तुम्ही Lifelong LL27 Electric Handheld Full Body Massager गिफ्टच्या रुपात नक्कीच विचार करु शकता. महत्त्वाचं म्हणजे ही बॉडी मसाजर 1099 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

7/8
इअरबर्ड्स
इअरबर्ड्स

महिला दिनानिमित्त तुम्ही boAt Airdopes 121v2 TWS Earbuds गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामध्ये हा पर्याय उत्तम ठरु शकतं. 1299 रुपयांपर्यंत हबे खरेदी केले जाऊ शकतात. 

8/8
इअररिंग्स
इअररिंग्स

महिलांना दागिने प्रचंड आवडतात. पण जर तुमचा बजेट 1000 रुपायंपर्यंतच असेल तर इअररिंग्सचा पर्याय उत्तम ठरु शकतं. यावेळी तुम्ही कानातल्यांचा विचार करु शकता. Giva सारख्या वेबसाईटवर असे कानातले उपलब्ध आहेत.  





Read More