PHOTOS

Bhadra Rajyog : 24 जूनला दुर्मिळ भद्रा राजयोग, 'या' राशींना अचानक धनलाभ होणार?

Bhadra Mahapurush RajYoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये बुध ग्रह हा सर्वात वेगाने फिरतो. येत्या 24 जूनला बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) भद्रा महापुरुष राजयोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या नशिबात पैसाच पैसा आहे. 

Advertisement
1/8
भद्रा महापुरुष राजयोग
भद्रा महापुरुष राजयोग

9 ग्रहांमधील बुध ग्रह सर्वाधिक वेगाने आपली स्थिती बदल असतो. बुध ग्रह 24 जूनला परत आपली स्थिती बदलणार आहे. बुध ग्रह 24 जूनला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 

2/8
'या' राशींचं नशिब उजळणार
'या' राशींचं नशिब उजळणार

या ग्रह गोचरमुळे भद्रा महापुरुष हा राजयोग निर्माण होतो आहे.  भद्रा योग हा पाच महापुरुष योगांपैकी एक असून तो अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग आहे. बुध ग्रह 24 जूनला दुपारी 12.35 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार असून तो 8 जुलैपर्यंत 2023 तो या राशीत असणार आहे. काही राशींचं नशिब पालटणार आहे. 

3/8
मीन (Pisces)
 मीन (Pisces)

या राशीच्या लोकांना वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. अचानक धनलाभ होणार असल्याने तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. व्यवसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होणार आहे. 

4/8
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी भद्रा महापुरुष राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. मुलांबद्दल आनंदाची बातमी मिळणार आहे. अचानक कुठूनतरी धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिय वातावरण आनंद राहणार आहे. सिंगल लोकांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होणार आहे. 

5/8
तूळ (Libra)
तूळ (Libra)

भद्रा महापुरुष राजयोगामुळे या राशीच्या लोकांचं नशिब बदलणार आहे. प्रवासातून फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा योग शुभ ठरणार आहे. 

6/8
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी भद्रा महापुरुष हा योग अतिशय फायदेशीर ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. 

7/8
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांना हा राजयोग शुभ ठरणार आहे. आर्थिक फायदासोबतच करिअरमध्ये तुम्ही यश गाठणार आहे. कुटुंबात आनंदाची बातमी मिळणार असल्याने आनंदाचं वातावरण असणार आहे. अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाची व्यक्ती येणार आहे. 

8/8
धनु (Sagittarius)
धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय अनुकूल असणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More