Rajasthan Chief Minister Oath: भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवत राजस्थानचा कारभार भजनलाल शर्मा यांच्या हाती सोपवला आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित होते. पाहूयात या सोहळ्याचे फोटो...
राजस्थानचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांनी आज पदाची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी पार पडला.
महिला उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमार यांनी शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवाही यांनीही शपथ घेतली.
जयपूरच्या सांगानेरमधून आमदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेले भजनलाल शर्मा यांना राज्यपाल कालराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजेही या शपथविधीला उपस्थित होत्या. तसेच केंद्रीय मंत्री अरुण राम मेघवाल आणि गजेंद्र सिंह शेखावत तसेच नितीन गडकरीही या कार्यक्रमाला हजर होते.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शाहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुषकर सिंग धामी हे या शपथविधीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बाजूलाच बसले होते.