PHOTOS

अभिनेत्रीची Bikini पोस्ट पाहून आईनेही 'Missing' कॅप्शनसहीत शेअर केले 'हे' फोटो

Bhavana Pandey Shares Ananya Panday Bikini Pictures: सध्याच्या घडीला आघाडीवर असलेल्या तरुण अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अनन्या पांडे. अनन्याने शनिवारी इन्स्टाग्रामवर आपले काही बिकीनीमधील फोटो शेअर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनन्याच्या आईनेच आपल्या लेकीचे काही बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो भारतामधील नाहीत. मात्र या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून त्यांना लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत, पाहूयात हे फोटो नेमकी आहेत कुठले अन् फोटो शेअर करताना या दोघींनी काय म्हटलंय...

Advertisement
1/11

अभिनेत्री अनन्या पांडेची आईने काही जुने फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. भावना पांडे यांनी हे फोटो शेअर करताना मिसिंग अशी एका शब्दाची कॅप्शन दिली आहे. येथील एका बिच रेस्तरॉमध्ये भावना, चंकी पांडे, अनन्या आणि तिची धाकटी बहीण रायसा एकत्र लंच करत असल्याचं एका फोटोत दिसत आहे. 

 

2/11

भावना पांडे यांनी शेअर केलेले फोटो काही आठवड्यांपूर्वीच पांडे कुटुंबीय भूमध्य समुद्रातील लिब्झा या स्पॅनिश बेटावर सुट्ट्यांसाठी गेले होते तेव्हाचे आहेत.

3/11

अन्य एका फोटोमध्ये भावना स्वत: सनबाथ घेताना दिसत आहेत. स्वत:चा पहुडलेला सेल्फीही भावना यांनी शेअर केलाय.

4/11

दुसऱ्या एका फोटोमध्ये अनन्या सनबाथचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनन्याने डोक्यावर हॅट आणि अॅक्वा ब्ल्यू कलरची बिकीनी परिधान केल्याचं दिसत आहे.

5/11

यापैकी एका फोटोमध्ये अनन्या आणि रायसा एकत्र स्विमिंगचा आनंद घेतानाही दिसत आहेत.

6/11

अनन्याने सोशल मीडियावर लिब्झा येथील सुट्टीदरम्यान क्लिक केलेले काही बिकिनीमधील फोटो शेअर केल्यानंतर भावना यांनी हे थ्रो बॅक फोटो शेअर केलेत.

7/11

लिब्झामधील एका वॉल पेटींगचाही फोटो अनन्याने शेअर केला आहे.

8/11

हॉटेलमधून लिब्झाचा समुद्रकिनारा कसा दिसतो हे अनन्याने कॅमेरात टिपलं आहे.

9/11

अनन्याने शेअर केलेल्या अन्य एका फोटोत बेट, बोटी आणि समुद्रकिनाराही दिसत आहे.

10/11

अनन्याने शेअर केलेल्या फोटोंपैकी एक फोटो बिकीनीमधील मीरर सेल्फी आहे.

11/11

अनन्याच्या अन्य एका फोटोमध्ये ती नारळपाणी पिताना दिसत आहे. या फोटोंना साडेआठ लाखांहून अधिक लाईक्स आहेत.





Read More