विद्या आणि माधुरी या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री आहेत. त्यांची चित्रपटाची फी कोटींमध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का 'भूल भुलैया 3' साठी सर्वात जास्त फी कोणी घेतली?
'भूल भुलैया 3' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षित आणि विद्या बालन देखील असणार आहेत.
नुकतेच या चित्रपटातील 'अमी जे तोमर' हे गाणं रिलीच झालं आहे. ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दिसत आहेत.
विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटांची फी ही कोटीमध्ये असते.
विद्या बालन ही 'भूल भुलैया'च्या पहिल्या भागात दिसली होती. दुसऱ्या भागात ती दिसली नाही. परंतु आता ती तिसऱ्या भागात दिसणार आहे.
माधुरी दीक्षित पहिल्यांदाच 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन एकत्र डान्स करताना दिसणार आहेत.
रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी विद्या बालनने 8 ते 10 कोटी रुपये फी घेतली आहे. तर माधुरी दीक्षितने 5 ते 8 कोटी रुपये फी घेतली आहे.
1 नोव्हेंबर रोजी या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव देखील दिसणार आहेत. जे तृप्ती आणि कार्तिकच्या विरोधात असणार आहेत.