पिंपरी-चिंचवड मध्ये आज इको पेडलर्स तर्फे महिला दिनानिमित्त चाफेकर चौक येथून सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
रॅली ही चाफेकर चौकातून चिंचवडे नगर -बिजलीनगर -भेळ चौक - भक्ती शक्ती चौक - ज्ञान प्रबोधिनी शाळा - डी. वाय .पाटील महाविद्यालय मार्गे भोंडवे कॉर्नर रावेत येथे पोहचली.
या रॅलीमध्ये एकूण १०८ महिलांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये १० ते ५० वयापर्यंतच्या महिलांचा समावेश होता.
जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे महिला दिन साजरा करण्यात आला.