tflix ची सुपरहिट वेब सिरीज Heeramandi प्रेक्षकांना खूप पसंत पडतेय. या सिरीजच्या रिलीजनंतर 11 दिवसांनी संजय लील...
संजय लीला भन्साळी यांचा 'हीरामंडी: द डायमंड बझार' OTT वर धुमाकूळ घालत आहे. 8 भागांची ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. सध्या OTT च्या जगात हीरामंडी ट्रेंडमध्ये आहे.
मुंबई 11 मे रोजी हिरामंडीची सक्सेस पार्टी झाली त्यात संजय लीला भन्साळी अतिशय आनंदी दिसत होते. या पार्टीला या सिरीजमधील सर्व कलाकार उपस्थितीत होते.
यावेळी हिरामंडीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. या सिरीजमधील एका अभिनेत्याने पत्रकाराशी बोलताना महत्त्वाची अपडेट दिली आहे.
तुम्हाला हिरामंडी आवडला असेल तर आता पुढील सीझनसाठी तयार राहा. कारण हिरामंडी 2 येणार असल्याची पुष्टी अभिनेता इंद्रेश मलिकने एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे.
या सिरीजमध्ये इंद्रेश मलिक उस्तादजींची भूमिका साकारली आहे. हिरामंडी 2 ची लवकरच घोषणा होणार असल्याचंही अभिनेत्याने सांगितलं.
मात्र हिरामंडी 2 कधी येणार याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
हिरामंडीमध्ये मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सेगल, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ताहा शाह बलोच, रजत कौल, शेखर सुमन, अध्यायन सुमन, फरदीन खान आणि इंद्रेश मलिक झळकले आहेत.