अय्यरने त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहोचवलं. श्रेयस अय्यर त्याच्या जबरदस्त खेळी आणि नेतृत्व गुणामुळे...
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकलं होतं. तर पंजाब किंग्सला सुद्धा श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वात आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये पोहोचवलं. मात्र आरसीबीकडून पराभव झाल्याने त्याला विजेतेपद पटकावता आले नाही.
श्रेयस अय्यर हा मल्टीटॅलेंटेड असून तो जेवढा चांगला क्रिकेटर आहे तेवढाच चांगला डान्सर आणि जादूगार सुद्धा आहे. हेच कारण आहे की मुलींमध्ये त्याची जबरदस्त क्रेज आहे. श्रेयस अनेक मुलींचा ड्रीम बॉय असून आतापर्यंत अनेक मुलींसोबत त्याचं नावं जोडलं गेलंय.
बिग बॉस 18 फेम अभिनेत्री ईडन रोज ही श्रेयस अय्यरची मोठी फॅन झाली आहे. ईडन रोज ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.
अभिनेत्री ईडन रोज ही मूळची दुबईची रहिवासी असून बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून करिअर करण्यासाठी ती भारतात मुंबईत आली.
फिल्मीज्ञान या युट्युब चॅनलला ईडन रोजने मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिनं सांगितलं की ती श्रेयस अय्यरची खूप मोठी चाहती आहे.
मुलाखतीत ईडन रोजने श्रेयसला तिच्या स्वपनांचा राजकुमार असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर ईडन रोजने असं देखील म्हटलंय की, तिने अय्यरला मनोमन आपलं पती मानलं असून ती स्वतःला त्याच्या दोन मुलांची आई मानते.
अभिनेत्री ईडन रोजला तीन वर्षांच्या स्ट्रगलनंतर पहिला ब्रेक 2023 मध्ये एका साऊथ सिनेमामधून मिळाला. सुपरस्टार रवि तेजा सोबत तिने 'रावणसुरा' मध्ये आयटम नंबरवर डान्स केला होता.
अभिनेत्री ईडन रोजला चित्रपटांमध्ये फार संधी मिळाली नाही. त्यानंतर तिला बिग बॉस 18 मध्ये ऑफर मिळाली. ईडन रोजला बिग बॉस शो मधून खूप लोकप्रियता मिळाली.