New Species Of Ancient Human: कैक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीर जीवसृष्टी निर्माण झाली आणि त्यानंतरच्या काळात तिची रुपं बदलत गेली.
New Species Of Ancient Human: अश्मयुगीन मानवापासून आजच्या दिवसापर्यंत मानवी उत्क्रांतीमध्ये अनेक टप्पे आले. याच मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा नुकताच समोर आला आहे.
शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनानुसार चीनमध्ये एका नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला असून, या प्रजातीचं नाव आहे होमो जुलुएंसिस. यापूर्वी सापडलेल्या रहस्यमयी डेनिसोवन्सशी या नव्या प्रजातीचे दात आणि जबडा मिळतेजुळते असल्यामुळं ती होमो जुलुएंसिस समूहाचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे.
'नेचर'मधील अहवालानुसार जीवाश्मांच्या वाढत्या संग्रहामुळं पूर्व आशियाई मानवी उत्पत्तीतील एक काळ उलगडला जाऊ शकतो. हा तोच काळ होता जेव्हा होमो जुलुएंसिसचा पृथ्वीवर सतत वावर होता.
अशी मान्यता आहे पृथ्वीवर साधारण 200,000 वर्षांपूर्वी होमो जुलुएंसिसचा वावर होता. ही प्रजाती दगडांपासून अवजारांची निर्मिती करत असे. इतकंच नव्हे, तर शिकार म्हणून ते वन्य घोड्यांचा पाठलागही करत असत.
संशोधनात मिळालेलं हे यश जीवाश्मांच्या अभ्यासातील एक नवा टप्पा ग्राह्य धरलं जात असून, आशियातील अतिशय क्लिष्ट प्रक्रिया यामुळं समोर येणार आहे.
हवाई विश्वविद्यालयातील मानव विज्ञान विभागाचे प्राचार्य क्रिस्टोफर जेबे यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत हा निरीक्षणपर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार हे निरीक्षण होमिनिन जीवाश्म रेकॉर्ड सिद्ध करत असून, यामध्ये होमो इरेक्टस, होमो निएंडरथलेंसिस किंवा होमो सेपियन्सच्या रुपात सहजपणे गणल्या न जाऊ शकणाऱ्या गोष्टीला समाविष्ट केलं जात होतं. (छाया सौजन्य- बीबीसी)