Bigg Boss Marathi Contestants List: बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वामध्ये कोणकोण असणार आहे याचा खुलासा काल रात्री झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातील यंदाचे स्पर्धकही फार आगळेवगेळे आहेत. कोणी किर्तनकार ते कोणी रिल स्टार, कोणी उद्योजक ते कोणी अभिनेत्री अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे 16 स्पर्धक नेमके कोण आहेत ते पाहूयात...
'बिग बॉस मराठी सिझन 5'चा ग्रॅण्ड प्रिमिअर रविवारी पार पडला. अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात यंदा कोण सहभागी होणार आहे पाहूयात...
बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या स्पर्धेक वर्षा उसगांवकर आहेत. मराठी सिनेमातील ड्रीमगर्ल म्हणत त्यांची ओळख करुन देण्यात आली आहे.
राघव म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणारा निखिल दामले बिग बॉस मराठीच्या घरात आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी दाखल झाला आहे.
कोकणी हिसका दाखवायला बिग बॉस मराठीच्या घरात मालवणचा चेडू अंकिता प्रभू वालावलकरही आहे.
'मराठी मनोरंजनाचा राजा, पॅडी कांबळे येतोय बिग बॉस मराठीच्या घरात टाकायला हास्याचा फुलटॉस,' असं म्हणथ पंढरीनाथ कांबळे चौथा स्पर्धक असल्याचं जाहीर केलं आहे.
मराठी रिल्समधून समोर आलेल्या योगिता चव्हाणचाही बिग बॉस मराठीमध्ये समावेश आहे.
नायकांचे राज्य संपणार, खलनायिका बनून जान्हवी किल्लेकर जायंट किलर बनणार का? असं म्हणथ अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मराठी बिग बॉसच्या घरात असेल असं सांगण्यात आलं आहे.
आपल्या गाण्यांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारा पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतही बिग बॉस मराठीमध्ये आहे.
नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये आहे.
डान्स परफॉर्मर इरिना रूडाकोवा हा अगदीच हटके स्पर्धक यंदा बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे.
डोंबिवलीची बोल्ड आणि ब्युटीफूल धाकड मराठी मुलगी, निक्की तांबोळी यंदा बिग बॉस मराठीच्या घरात असेल असं जाहीर करण्यात आलं आहे.
बारामतीचा रांगडा गडी, वैभव चव्हाणही यंदाच्या बिग बॉस मराठीचा स्पर्धक आहे.
'स्प्लीट्स व्हिला' गाजवलेला अरबाज पटेलही यंदा मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होतोय.
यंदा मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून महाराष्ट्राची यंग रॅप स्टार, आर्या जाधवही सहभागी होत आहे.
किर्तनकार पुरूषोत्तमदादा पाटीलसुद्धा यंदा बिग बॉस मराठीच्या घरात दिसतील.
उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा धनंजय पोवार हा कोल्हापुरी गडी बिग बॉस मराठीच्या घरात असणार आहे.
टिकटॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाणही यंदा बिग बॉसच्या घरात असेल असं जाहीर करण्यात आलं आहे.
रोज रात्री 9 वाजता ‘बिग बॉस मराठी’ प्रेक्षकांना पाहता येणार आहे.