Mukesh ambani favourite dish : अंबानी कुटूंबाबद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल वाटतं. गडगंज श्रीमंत व्यक्ती काय खात असतील? असा सवाल लहान चिमुकला पण विचारतो.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची अंदाजे एकूण संपत्ती 88.4 अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे 7,32,221 कोटी रुपये आहे.
एवढी मोठी संपत्ती असताना देखील मुकेश अंबानी आणि कुटूंब भारतीय परंपरेने राहणं आणि भारतीय पदार्थांचा जेवणात समावेश करतात.
मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या फेवरेट डिशविषयी माहिती दिली होती. पाहा काय म्हणाले अंबानी?
'माझी फेवरेट डिश साऊथ इंडियन आहे, मी इडली आणि सांबर खाणं पसंत करतो', असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.
मुंबईचे प्रसिद्ध कॅफे म्हैसूर माटुंगा हे मुकेश अंबानींचे आवडते रेस्टॉरंट आहे. येथून ते जवळपास दर आठवड्याला जेवण ऑर्डर करतात.
कॉलेजच्या दिवसांमध्ये ते आपल्या मित्रपरिवारासह या रेस्टॉरंटमध्ये येत असतात. प्युअर व्हेजिटेरियन कॅफे सामूर 1936 मध्ये सुरू झाले. मुंबई कॅफे म्हैसूर हे माटुंग्यातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे.
एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी रात्रीच्या जेवणात गुजराती पद्धतीचे पदार्थ खायला आवडतात. पौष्टिक पदार्थांसोबतच अतिशय पारंपरिक पदार्थांचा समावेश आहारात असतो.