IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल.
टीम इंडियाचं कॅप्टन्सी सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर चरिथ असलंका श्रीलंकेचा नवा कॅप्टन असेल. अशातच धक्कादायक माहिती समोर आलीये.
बिनुरा फर्नांडो या खेळाडूला छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
बिनुरा फर्नांडोला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागल्याने रमेश मेंडिसला स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात आणण्यात आलं आहे.
दरम्यान, श्रीलंकेचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमिरा आणि नुवान तुषारा हे दोन्ही गोलंदाज जायबंदी झाल्याने लंकेला आणखी एक धक्का बसला आहे.