PHOTOS

Birthday Special: फडणवीसांपेक्षा मिसेस CM अधिक श्रीमंत; दोघांची एकूण संपत्ती किती पाहिलं का?

Devendra Fadnavis Vs Amruta Fadnavis Who Is More Rich: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या संपत्तीचा तपशील खरोखरच थक्क करणारा आहे. नेमकी किती संपत्ती आहे या दोघांकडे जाणून घेऊयात आज देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तच्या या खास फोटोगॅलरीमधून...

Advertisement
1/14
फडणवीसांकडे सोनं किती?
फडणवीसांकडे सोनं किती?

आज 56 व्या वर्षात प्रवेश करत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती सोनं आहे माहितीये का? फडणवीसांकडे कोणती कार आहे? त्यांच्या नावावर किती कोटींची जमीन आहे? अमृता यांच्याकडील एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आज फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त...

2/14
फडणवीसांचा आज 55 वा वाढदिवस
फडणवीसांचा आज 55 वा वाढदिवस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. फडणवीस यांचा जन्म 22 जुलै रोजी 1970 साली झाला. आज भाजपा समर्थकांबरोबरच देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांकडूनही त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातोय.

 

3/14
अमृता फडणवीस अधिक श्रीमंत
अमृता फडणवीस अधिक श्रीमंत

फडणवीस यांनी वयाच्या 35 व्या वर्षी म्हणजेच सन 2005 मध्ये अमृता यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांची पत्नी अमृता फडणवीस अधिक श्रीमंत आहेत. या दोघांकडे नेमकी किती संपत्ती आहे आणि अमृता फडणवीस पतीपेक्षा किती श्रीमंत आहेत ते आज देवेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात...

 

4/14
देवेंद्र यांची संपत्ती किती?
देवेंद्र यांची संपत्ती किती?

देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 5.2 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये 56 लाखांची जंगम आणि 4.6 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात शेतजमीन आणि निवासी संपत्ती आहे. फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत संपत्तीचं विवरण जोडलं होतं.

5/14
वर्षाला किती पैसे कमवतात देवेंद्र?
वर्षाला किती पैसे कमवतात देवेंद्र?

फडणवीसांच्या त्यावेळेच्या विवरणपत्रानुसार, ताज्या तपशीलानुसार, त्यांनी 2023-24 आर्थिक वर्षात 38.7 लाख आणि 2022-23 आर्थिक वर्षात 38.6 लाख वार्षिक उत्पन्न जाहीर केलं होतं. 

6/14
बँकांमध्ये किती पैसे?
बँकांमध्ये किती पैसे?

सदर शपथपत्र दाखल करताना फडणवीस यांच्याकडे 23 हजार 500 रुपये रोख रक्कम आहे, तर 2.3 लाख इतकी रक्कम बँकांमध्ये जमा असल्याचं सांगण्यात आलेलं.

7/14
साडेतीन कोटींचा भूखंड
साडेतीन कोटींचा भूखंड

फडणवीस यांची नागपुरात दोन भूखंडांवर घरे आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार एकाची किंमत 3.5 कोटी आणि दुसऱ्याची किंमत 47 लाख आहे.

 

8/14
32 लाखांचं सोनं
32 लाखांचं सोनं

फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 1.7 लाख ची पीपीएफ रक्कम आणि 3 लाख किमतीची आयसीआयसीआय पीआरयू लाइफ टाइम क्लासिक पॉलिसी देखील जाहीर केली आहे. तसंच फडणवीस यांच्याकडे एकूण 32 लाखांचं सोनं आहे. 

 

9/14
मालकीची एकही गाडी नाही
मालकीची एकही गाडी नाही

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एकही गाडी नाही. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडेही गाडी नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. 

 

10/14
अमृता फडणवीसांचा संपत्ती किती?
अमृता फडणवीसांचा संपत्ती किती?

दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी 7.9 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये 6.9 कोटी जंगम आणि 95 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. 

 

11/14
एका वर्षात किती पैसे कमवतात अमृता?
एका वर्षात किती पैसे कमवतात अमृता?

अमृता फडणवीसांचं 2023-24 मध्ये वार्षिक उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये होतं. 2022-23 मध्ये वार्षिक उत्पन्न 92 लाख 48 हजार 95 रुपये होते. 2020-21 मध्ये हा आकडा 1 कोटी 84 लाख 38 हजार 355 होतं. 

 

12/14
म्युच्युअल फंडांमध्ये अमृता यांची मोठी गुंतवणूक
म्युच्युअल फंडांमध्ये अमृता यांची मोठी गुंतवणूक

प्रतिज्ञापत्रानुसार अमृता फडणवीसांकडे 10 हजार रोख रक्कम आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये 5.6 कोटींची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे 65 लाखांचे दागिने आहेत. 

 

13/14
पाच वर्षात वाढली फडणवीसांचा संपत्ती
पाच वर्षात वाढली फडणवीसांचा संपत्ती

2019 च्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना फडणवीस यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 3.86 कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. म्हणजेच त्यांची संपत्ती पाच वर्षात 1 कोटी 34 लाखांनी वाढली.

 

14/14
पत्नी आणि देवेंद्र यांच्या संपत्तीत फरक किती?
पत्नी आणि देवेंद्र यांच्या संपत्तीत फरक किती?

म्हणजेच अमृता फडणवीस यांच्याकडे पतीपेक्षा 2.7 कोटी रुपयांचा अधिक संपत्ती आहे. अमृता या एका बँकेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (सर्व फोटो - देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)





Read More