PHOTOS

घटस्फोट, अफेअर, ब्रेकअप, एकूण संपत्तीचा आकडा अन्... Bold & Beautiful शिवाय सईबद्दलच्या 'या' गोष्टी ठाऊक आहेत का?

Intresting Facts About Heighest Paid Actress In Marathi: सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मराठी अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. मात्र तिची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का? त्याबद्दल जाणून घेऊयात तिच्या वाढदिवसानिमित्त...

Advertisement
1/14

आज सईचा 39 वा वाढदिवस आहे. या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला ठाऊक नसलेल्या काही खास गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

2/14

तिची ओळख केवळ 'बोल्ड आणि ब्युटीफूल' अशी असली तरी तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांना ठाऊक नाहीत. त्याबद्दलच तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात...

3/14

सामान्यपणे केवळ तिच्या बोल्ड आणि रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या या अभिनेत्रीचा आजपर्यंतचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त यावरच नजर टाकूयात...

 

4/14

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, सई ताम्हणकर! बोल्ड , बिनधास्त अभिनेत्री अशी सईची ओळख सांगितली जाते.

 

5/14

सई आज 39 वर्षांची झाली असून ती मूळची सांगलीची. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटक, एकांकिकेतून सई सहभाग घ्यायची. यातूनच तिला ब्लॅक अँड व्हाइट हिंदी चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. 

 

6/14

2005 मध्ये सई सांगलीमधून अभिनयाच्या ओढीने मुंबईत आली आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही.

 

7/14

दुनियादारी, सनई चौघडे, राडा रॉक्स, नो एन्ट्री पुढे धोका आहे, धागे दोरे, पोर बाजार, हंटर, वजनदार अशा अनेक चित्रपटांनी सईला मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये नायिका म्हणून वेगळी ओळख मिळाली.

 

8/14

गेल्या काही वर्षात सईने हिंदी चित्रपट सृष्टीतही आपली छाप सोडली आहे. अगदी सहाय्यक भूमिका ते प्रमुख भूमिका अशी मजल तिने मारलेली पाहायला मिळाली. 

 

9/14

2013 साली अमेय गोस्वामी सोबत ती विवाहबद्ध झाली पण अवघ्या दोन वर्षातच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

 

10/14

अमेय मनोरंजन क्षेत्रात काम करत असून आजही हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

 

11/14

मध्यंतरी सई अनिश जोगच्या प्रेमात पडली पण काहीच महिन्यात त्या दोघांनी ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले.

 

12/14

महागडया गाड्या खरेदी करणारी मराठी अभिनेत्री अशीही सईची ओळख आहे. 

 

13/14

सईने 2022 साली मालाडमधील एका आलिशान इमारतीमधील 45 व्या मजल्यावर स्वत:चं घर घेतलं. हे 3 बीएचके घर तिचं मुंबईतील पहिलं हक्काचं घर आहे.

 

14/14

आता सईची संपत्ती किती असा प्रश्न पडला असेल तर सई एका चित्रपटासाठी 20 ते 25 लाख रुपये मानधन घेते. 'मेन्स एक्सपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, सईची नेटवर्थ 41,37,05,000 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं. 

 





Read More