Sai Tamhankar Tattoo Meaning: मराठी चित्रपट सृष्टीमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधील हटके भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या साई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. सईच्या फोटोंबरोबरच सोशल मीडियावर अनेकदा तिच्या टॅटूचीही चर्चा असते. पण या टॅटूचा नेमका अर्थ काय? याचं कनेक्शन कोणाशी आणि काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सईनेच एका स्पेशल व्यक्तीचं नाव घेत दिलेलं...
मराठीमधील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. सई आज 37 वर्षांची झाली.
आपल्या अभिनयाबरोबरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील परिक्षक म्हणूनही सई घराघरात पोहोचली आहे.
सईचे फोटो सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरतात. या फोटोंमधील सईच्या अदांबरोबरच आणखीन एक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे टॅटू.
सईच्या उजव्या खांद्यावर एक मोठ्या आकाराचा टॅटू आहे. सईच्या खांद्यावरील हा टॅटू तिने पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये दिसून येतो.
खरं तर सई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. सईने खांद्यावर रोमन लिपीत 2 तारखांबरोबरच हातावर आणि बोटावरही टॅटू काढले आहेत.
सई कनसेप्ट टॅटूजची मोठी फॅन असल्याने तिने आपल्या शरीरावर एकूण 4 टॅटू काढून घेतले आहेत.
सईने खांद्यावर रोमन लिपीत 2 तारखा गोंदल्या आहेत, ज्या तिच्यासाठी फारच स्पेशल आहेत. यासंदर्भात तिनेच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.
सईच्या खांद्यावरील या टॅटूमधील आकडे एप्रिल महिन्यातील 2 तारखा दर्शवतात. सईच्या खांद्यावरील टॅटूचा अर्थ 27 एप्रिल आणि 7 एप्रिल असा आहे.
या दोन्ही तारखा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत असं सईनेच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
सई ताम्हणकरने 2013 मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र सई आणि अमेयचं लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. 2013 मध्ये लग्न झाल्यानंतर सईने 2015 मध्ये अमेयला घटस्फोट दिला.
माझे सर्व टॅटू हे अमेयसोबतच्या नात्यासंदर्भातील असल्याचंही सईने सांगितलं होतं.
तिच्या खांद्यावरील 2 तारखांपैकी एक तारीख लग्नाची आहे. तर दुसरी तारीख ही अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आठवण म्हणून तिने खांद्यावर गोंदवलीय.
सईच्या मानेवर तिच्या पतीचं म्हणजेच अमेयचं नाव गोंदवलेलं आहे. हे नाव हिब्रू लिपीमध्ये गोंदवलेलं आहे.
उजव्या हाताच्या अंगठ्यावर सईने स्टारचा टॅटू काढून घेतला आहे.
सईच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटावर HBPHG असं गोंदवलं आहे. HBPHG ही हीप हॉप डान्स प्रकारातील एक स्टेप असून ही अमेय आणि सईची आवडती स्टेप आहे.