Saie Tamhankar Home On 45th Floor See Photos: सई मुंबईत एकटी राहत असूनही तिने 3 बीएचकेचं आलिशान घर घेतलं आहे. तिने तिचं घर घेण्याचं स्वप्न दोन वर्षांपूर्वी पूर्ण केलं आहे. हे घर कसं आहे आणि त्याला तिने खास नाव का आणि कशासाठी दिलंय जाणून घ्या रंजक गोष्ट तिच्या वाढदिवसानिमित्त...
मुंबईतील एका इमारतीत 45 व्या मजल्यावर घेतलेल्या आलिशान घराचं नाव सईने 'The 11th Place' असं का ठेवलंय? हे घर आतून कसं दिसतं? जाणून घेऊयात रंजक माहिती...
अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज 39 वा वाढदिवस आहे. सई मुळची सांगलीची असून ती सध्या मराठीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री हे. सईने नुकतेच तिचे एक स्वत: पूर्ण केलं. हे स्वप्न म्हणजे स्वत:चं घर घेण्याचं. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
2023 च्या सुरुवातीलाच सईने मुंबईतील मालाड परिसरात स्वत:च्या हक्काचं पहिलं घर खरेदी केलं. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
अभिनयाच्या वेडापायी 2005 मध्ये सांगलीहून मुंबईत आल्यावर सई जवळपास 18 वर्ष भाड्याच्या घरात राहत होती. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
मुंबईत आल्यापासून सई तिच्या आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण 10 घरांमध्ये राहिली. मात्र तिला स्वत:चं घर घ्यायचं होतं. ते स्वप्न तिने 2022-23 मध्ये पूर्ण केलं. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
यामुळेच सई 11 व्या घरात राहायला गेली ते तिचं हक्काचं स्वत: विकत घेतलेलं घर ठरलं. म्हणूनच तिने तिच्या या नव्या आलिशान घराला ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
सईने तिच्या नव्या घराचा संपूर्ण व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर शेअर केलेला. या व्हिडीओमध्ये तिच्या घरातील मोठ्या खिडक्या असलेल्या प्रशस्त खोल्या, वॉकिंग वॉर्डरोब, आकर्षक फर्निचरची झलक पाहायला मिळालेली. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
सईचं ‘द इलेव्हन्थ प्लेस’ हे नवीन घर मुंबईतील मालाडमधील एका इमारतीमध्ये 45 व्या मजल्यावर आहे. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
सई मुंबईत एकटीच राहत असली तरी तिने घेतलेलं घर हे 3 बीएचकेचं आहे. तिने तिची आवड आणि इच्छेनुसार हे घर सजवलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
सईच्या या 45 व्या मजल्यावरील घराच्या मोठ्या खिडक्यांमधून अतिशय सुंदर व आकर्षक व्ह्यू पाहायला मिळतो. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)
सई इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घरातून क्लिक केलेले आणि रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर कसा दिसतो हे दाखवणारे फोटो शेअर करत असते. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकरच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)