Birthday Special Sharad Pawar Net Worth: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रमुख नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे पाहूयात..
शरद पवार यांचा आज 84 वा जन्मदिवस. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीमध्ये झाला. शरद पवार हे मागील 50 वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय राजकारणामध्ये आहेत. एवढ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतर शरद पवार यांच्याकडे किती मालमत्ता आहे (Sharad Pawar Net Worth) हे आता जाणून घेऊया.
2020 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी सादर केलल्या शपथपत्रात पवार यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे.
शरद पवारांकडे सुमारे 32.73 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
2020 साली, शरद पवारांकडे एकूण 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपयांची जंगम मालमत्ता होती. तर स्थावर मालमत्तेची किंमत ही 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये इतकी आहे.
शरद पवारांची एकूण संपत्ती 32.73 कोटी रुपये आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांच्या कुटुंबावर 2020 सालापर्यंत एकूण 1 कोटींचे कर्ज होते.
शरद पवार यांच्या कुटुंबीयांनीही शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.
3 वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या कुटुंबीयांकडे 88 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. आजच्या घडीला त्यांची किंमत ताज्या बाजारभावानुसार नक्कीच अधिक असेल.
शरद पवार महाराष्ट्रात कुठेही दौऱ्यावर गेले तर त्यांच्या मागे गाड्यांचा मोठा ताफा असतो. अनेकदा शरद पवार लक्सएस एलएक्स 570 किंवा टोयोटा लँड क्रूझर कारमध्ये दिसतात.
शरद पवार ज्या गाड्यांमधून प्रवास करता त्या दोन्ही अतिशय महागड्या आणि आलिशान कार आहेत. टोयोटा लँड क्रूझरची आजच्या तारखेला किंमत सुमारे 1.30 कोटींच्या आसपास आहे. लक्सएस एलएक्स 570 ची किंमत साधारपणे 2.40 कोटी रुपये आहे.
शरद पवार या गाड्या वापरत असले तरी त्यांच्या नावावर या गाड्या नाहीत. शरद पवारांच्या मालकीची एकही कार नाही असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
शरद पवारांकडे स्वत:कडे 848.070 ग्राम सोनं आहे. याची किंमत 2020 मध्ये 38 लाख 17 हजार होती. पवारांकडे 15,171 ग्राम चांदीही आहे. या चांदीची किंमत 6,70,179 इतकी होती. जी नक्कीच आता जास्त असेल.
शरद पवारांच्या पत्नीकडे 19 लाख 59 हजार 970 रुपये मूल्याचं सोनं आणि 7,54,111 रुपये किंमतीची चांदी आहे.
शरद पवारांची संपत्ती 8 कोटींच्या आसपास आहे. पत्नीची संपत्ती 13 कोटींहून अधिक आहे.