...ओळख त्यांच्याशी ज्यांच्यामुळे सलमान खानला मिळाली शिक्षा!
काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. सलमानला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळवून देण्यात बिश्नोई समुदायाच्या काही गावकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलीय.
१-२ ऑक्टोबर १९९८ च्या रात्री जोधपूरच्या लुनी स्टेशनच्या कंकाणी गावात दोन काळवीटांची हत्या करण्यात आली होती. या गावातील रहिवासी बिश्नोई समुदायाशी निगडीत आहेत. या समुदायात धार्मिक कारणासाठी काळवीट महत्त्वाचं मानलं जातं. याच समुदायाच्या तक्रारीनंतर सलमान खानसमवेत सात आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आली.
बिश्नोई समुदाय पश्चिमी थार वाळवंटातील धार्मिक समूह आहे. हा समाज पशु तसंच वन संरक्षणसाठी प्रतिबद्ध मानला जातोय. या संप्रदायाची स्थापना गुरु जंभेश्वर (१४५१ - १५३६) यांनी समराथाल धोरामध्ये केली होती.
हा धार्मिक समूह असला तरी प्रकृतीवर प्रेम करणारा हा धार्मिक समूह आहे. या समुदायाचं सर्वात प्रसिद्ध मंदिर बीकाने पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकाममध्ये स्थित आहे.
हा धार्मिक समूह असला तरी प्रकृतीवर प्रेम करणारा हा धार्मिक समूह आहे. या समुदायाचं सर्वात प्रसिद्ध मंदिर बीकाने पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकाममध्ये स्थित आहे.