PHOTOS

वादात सापडलेलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोणी बांधलं? एवढ्या सवलती, अनुदाने का मिळतात?

History Of Deenanath Mangeshkar Hospital: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या एका गरोदर महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत आलं आहे. मात्र या रुग्णालयाला एवढी सवलत का दिली जाते? या रुग्णालयाचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात...

Advertisement
1/12

अनेक सेलिब्रिटी उपचार घेतात असे मात्र सध्या वादात सापडलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. मात्र या रुग्णालयाचा इतिहास काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. या रुग्णालयाला एवढ्या देगण्या आणि सवलती का दिल्या जातात? नेमकं हे रुग्णालय कधी सुरु केलं आणि इतर तपशील जाणून घेऊयात...

2/12

पुण्यातील नामवंत अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला उपचार नाकारण्यात आले. पैशाअभावी रुग्णालयाने उपचार केल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार अमित गोरखेंनी हा आरोप केला आहे.

3/12

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून 2001 मध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ची स्थापना करण्यात आली. 

 

4/12

सर्वसामान्य रुग्णांना कुठल्याच प्रकारचा भेदभाव न बाळगता उत्तम दर्जाचे उपचार माफक खर्चामध्ये उपलब्ध करून देणे हे हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे.

 

5/12

ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून हॉस्पिटलचे संचलन केले जाते. प्रसिद्ध सर्जन डॉक्टर धनंजय केळकर हे हॉस्पिटलचे प्रमुख आहेत

 

6/12

पुण्याच्या एरंडवणे भागात सहा एकर भूखंडावर सर्व सोयीसुविधांनी युक्त अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

7/12

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी धर्मादाय रुग्णालय म्हणून करण्यात आलेली आहे. 

8/12

हॉस्पिटलच्या उभारणीसाठी शासनाकडून नाममात्र दराने जमीन मिळालेली आहे. हॉस्पिटलमध्ये सुमारे 800 रुग्णांवर एकाच वेळी उपचार होऊ शकतात 

 

9/12

धर्मादाय हॉस्पिटल असल्याकारणाने हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणावर अनुदाने, सवलती तसेच देणग्या प्राप्त होतात.

 

10/12

अलीकडेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अंतर्गत पुलाच्या बांधणीसाठी आठ हजार चौरस फूट शासकीय जागा एक रुपया दराने दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आमदाराच्या पीएच्या पत्नीच्या निधनानंतर ही बाब आता चर्चेत आली आहे.

 

11/12

दिग्गज कलावंत, साहित्यिक, खेळाडू, उद्योजक तसेच राजकीय क्षेत्रातील नामवंत रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी प्रसिद्ध अशी या हॉस्पिटलची प्रतिमा आहे. 

 

12/12

पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हॉस्पिटलचे हितचिंतक आहेत. (सर्व फाइल फोटो वेबसाईटवरुन/ सोशल मीडियावरुन साभार)





Read More