Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. याबाबत पेले यांची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्रामवरून माहिती दिली. कोलन कॅन्सरमुळे पेले हे गेल्या काही दिवसांपासून ते साओ पाऊलो रुग्णालयात दाखल होते. पेले यांचं मूळ नाव एडसन एरंटेस डो नासिमेंटो होतं. दमदार खेळीमुळे ते ब्लॅक पर्ल, किंग ऑफ फुटबॉल, किंग पेले या नावांनीही ओळखले जायचे. पेले हे त्यांच्या काळातील सर्वांत महागडे फुटबॉलपटू होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं. हीराबेन यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अहमदाबाद येथी मेहता हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता त्यांचे निधन झाले. हिराबा यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) ट्वीट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली.
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. (Rishabh Pant Car Accident) रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंत यांची कार रेलिंगला धडकली. अपघातानंतर या कारने पेट घेतला. पंतला अपघातात गंभीर जखमी झाला असून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याच्या कारचा वेग प्रचंड होता. अपघात झाला तेव्हा कारचा वेग ताशी 200 किमी असा होता, त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही, अशी माहिती समोर आली आहे.