Arjun Kapoor Buys Electric Scooter: अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच वेगवेगळ्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकतेच त्याने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. मुंबईतील विलेपार्ले येथे त्याने त्याच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची पूजा केली आहे.
अर्जुन कपूर नेहमी करोडोंच्या कारमधून प्रवास करत असतो. मात्र, आता त्याने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे.
अभिनेत्याने इलेक्ट्रिक स्कूटर BGauss RUV 350 खरेदी केली आहे. यावेळी त्याने स्कूटरसोबत हटके पोज दिल्या आहेत.
ज्यावेळी त्याची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घरी आली त्यावेळी त्याने नारळ फोडून तिला हार घालून तिचे स्वागत केले.
त्यानंतर अर्जून कपूरने त्याच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची चावी घेत फोटोशूट केलं आहे. यावेळी तो खूप खूश होता.
अभिनेत्याने खरेदी केलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटर किंमत 1.10 लाख रुपये आहे. ही भारतातील पहिली RUV स्कूटर आहे.