20-40 नाही तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने करण जौहरच्या आगामी चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी. जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या फीमुळे चर्चेत आला आहे.
2024 हे वर्ष कार्तिक आर्यनसाठी खास ठरले आहे. अभिनेत्याचे दोन मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. ज्यामध्ये 'भूल भुलैया 3' चित्रपटाने खळबळ उडवून दिली.
सध्या कार्तिक आर्यनकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. त्याचा 'पति-पत्नी और वो 2' हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. अशातच त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. त्याचा 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या या नवीन चित्रपटाची निर्मिती करण जौहर करणार आहे. दरम्यान, झूमच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्याने किती फी घेतली याची माहिती समोर आली आहे.
या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने तब्बल 50 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे. रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठी कार्तिकने 40 कोटी रुपये फी घेतली होती.
'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनने त्याच्या फीमध्ये वाढ केली आहे. आता त्याला 40 ते 50 कोटी रुपये इतकी फी मिळत आहे.