PHOTOS

सलमान खानच्या Galaxy Apartment चे Inside Photos; प्रत्येक फोटो पाहून भारावून जाल

Salman khan house galaxy apartment inside photos : तिथं सलमानच्या घरावर गोळीबार झाला आणि इथं यंत्रणांनी तातडीनं कारवाई करण्यात सुरुवात केली. ज्यानंतर सोशल मीडियापासून सगळीकडेच गॅलेक्सीचीच चर्चा पाहायला मिळाली. 

 

Advertisement
1/7
galaxy
galaxy

Salman khan house galaxy apartment inside photos : हिंदी कलाजगतामध्ये जवळपास 20 वर्षांहून अधिक काळापासून अभिनय करणाऱ्या सलमान खानचं घर मुंबईतील वांद्रे येथे बँडस्टँड परिसरात आहे. 

2/7
8 मजली गॅलेक्सी
8 मजली गॅलेक्सी

इथं 8 मजली गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान त्याच्या आईवडिलांसह राहतो. सूत्रांच्या माहितीनुसार तळमजला  सलमानचा असून, त्याचे आईवडिल पहिल्या मजल्यावर राहतात. 

 

3/7
घराची किंमत
घराची किंमत

'रिपब्लिक वर्ल्ड'च्या माहितीनुसार सलमानखानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराची किंमत साधारण 16 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. या गॅलेक्सी इमारतीततच सलमानच्या कुटुंबातील अनेकजण वास्तव्यास आहेत. 

 

4/7
1BHK फ्लॅट
1BHK फ्लॅट

सलमाननं आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये त्याचा एकत्र कुटुंबपद्धतीवर असणारा विश्वास व्यक्त केला असून, आपल्याला एकत्र कुटुंबातच आनंद मिळत असल्याचं सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे सलमान या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅटमध्येच राहतो. 

 

5/7
घराच्या आतील काही छायाचित्र
 घराच्या आतील काही छायाचित्र

सलमानच्या घराच्या आतील काही छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यामध्ये सौम्य रंगांचा वापर, पुरेसा सूर्यप्रकाश आणि किमान सामान अशी त्याच्या घराची एकंदर रचना पाहायला मिळते. 

6/7
सलमानचं बालपण
सलमानचं बालपण

या वास्तूशी अनेक आठवणी जोडल्या गेल्यामुळं सलमान इथून कुठेही दुसरीकडे वास्तव्यास जायला तयार नसल्याचं सांगितलं जातं. असंख्य चाहते दरवर्षी सलमानच्या या घराची एक झलक पाहण्यासाठी वांद्र्यातील या परिसराला भेट देतात. गॅलेक्सी अपार्टमेंट ही तिच वास्तू आहे जिथ सलमान खान त्याचे दोन्ही भाऊ, अरबाज, सोहोल आणि त्याच्या बहिणींसमवेत मोठा झाला. 

7/7
बॉलिवूडचा किंग शेजारी...
बॉलिवूडचा किंग शेजारी...

सलमानच्याच घरापासून काही अंतरावर बॉलिवूडचा किंग, अभिनेता शाहरुख खान याचा 'मन्नत' हा बंगला आहे. त्यामुळं बँडस्टँड परिसरात आलेले असंख्य चाहते या दोन्ही कलाकारांच्या घराला एकदातरी न्याहाळत पुढे जाताना दिसतात. 





Read More