Sidharth Malhotra Kiara Advani wedding : कुटुंबातील मंडळी आणि खास मित्रपरिवार अशा साधारण 100 - 125 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
सध्या लग्नाची संपूर्ण तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत त्या म्हणजे किआराच्या आईनं (Kiara Advani mother).
फॅशनच्या बाबतीत सांगावं तर, किआराचा फॅशन सेन्स नेमका कुठून आला हे तिच्या आईकडे पाहूनच लक्षात येत आहे. थोडक्यात तिची आईसुद्धा कमाल स्टायलिस्ट आहे.
जिनेविव अडवाणी म्हणजेच किआराची आई शिक्षिका होती. पण, त्यानंतर मात्र त्यांनी जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवाच केली.
किआराचे बाबा, जगदीप आणि आई जिनेविव यांनीही एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
किआरा दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांची पणती आहे, तर ईशा अंबानी ही तिची बालमैत्रीण आहे. मनमिळाऊ स्वभाव आणि इतरांपोटी वाटणारी काळजी या स्वभावामुळं किआरा कायमच सर्वांच्या मनात घर करणारी.
अशी ही अभिनेत्री आता तिच्या जीवनाची एक नवी सुरुवात करु पाहत आहे. तिला या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.