पत्नी सोनालीच्या अपघातानंतर सोनू सूदने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद नुकतीच एका मोठ्या अपघातातून बचावली आहे. अपघातानंतर सोनू सूदने चाहत्यांना व्हिडीओ शेअर करत इशारा दिला आहे.
अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामधून सोनू सूदने चाहत्यांना गाडी चालवताना सीट बेल्ट घालण्याचे महत्त्व सांगितले आहे.
अभिनेता म्हणाला की, गेल्या आठवड्यात नागपुरात एक मोठा अपघात झाला. त्यावेळी गाडीमध्ये माझी पत्नी आणि तिची बहीण होत्या. त्यांनी सीट बेल्ट लावल्यामुळे त्या वाचल्या.
सोनू सूदची पत्नी सोनालीने तिच्या बहिणीला सीट बेल्ट लावण्यास सांगितले. त्यांनी सीट बेल्ट लावला आणि अवघ्या काही मिनिटातच त्यांचा अपघात झाला. पण त्या सीट बेल्टमुळे सुरक्षित राहिल्या.
व्हिडीओ शेअर करताना सोनू सूदने कॅप्शनमध्ये म्हटले की, सीट बेल्ट नाही तर कुटुंब नाही. जरी तुम्ही मागच्या सीटवर बसला असलात तरी तुम्ही सीट बेल्ट लावलाच पाहिजे.
सध्या चाहते सोनू सूदच्या या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने सोनू सूद हा खऱ्या आयुष्यातील हिरो असल्याचं म्हटलं आहे.
अभिनेत्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा शेवटचा चित्रपट 'फतेह' होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खास कामगिरी करू शकला नाही.