PHOTOS

12 वर्षात फक्त 1 हिट चित्रपट, अल्लू अर्जुन आणि प्रभास पेक्षा श्रीमंत आहे 'हा' फ्लॉप अभिनेता, नेटवर्थ पाहून थक्क व्हाल

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले आहेत. असाच एक अभिनेता आहे, ज्याने 12 वर्षात 1 हिट चित्रपट दिला आहे.

Advertisement
1/7
बॉलिवूड अभिनेता
बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांचा मुलगा जायद खानचे फिल्मी करिअर हे खूप खराब राहिले आहे. 12 वर्षात त्याने फक्त 1 हिट चित्रपट दिला आहे. 

2/7
मैं हूँ ना
मैं हूँ ना

ज्यामध्ये जायद हा सहाय्यकाच्या भूमिकेत होता. ज्याचे नाव 'मैं हूँ ना' आहे. अभिनेत्याने 2003 मध्ये 'चुरा लिया है तुमने' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

3/7
फ्लॉप चित्रपट
फ्लॉप चित्रपट

यानंतर अभिनेत्याने सुमारे 17 ते 18 चित्रपटांमध्ये काम केलं. जे सर्व फ्लॉप ठरले. चित्रपट सतत फ्लॉप होत असल्यामुळे त्याने मोठे पाऊल उचलले. 

 

4/7
अभिनयापासून दूर
अभिनयापासून दूर

2015 मध्ये अभिनेत्याचा 'शराफ़त गई तेल लेने' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तेव्हापासून अभिनेता अभिनयापासून दूर आहे. 

5/7
गुंतवणूक
गुंतवणूक

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याला बिझनेस मॅनेजमेंटच्या पदवीचा फायदा झाला. त्याने अनेक स्टार्टअप आणि व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली. 

6/7
जायदचे नेटवर्थ
जायदचे नेटवर्थ

2024 मध्ये ET Now ने जायदची एकूण संपत्ती 1500 कोटी रुपये असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एका मुलाखतीत जायदने आकडेवारीची पुष्टी केली नाही आणि नाकारली नाही. तो फक्त हसला. 

 

7/7
अल्लू अर्जुन आणि प्रभास
अल्लू अर्जुन आणि प्रभास

जायदच्या संपत्तीचे आकडे बरोबर असतील तर अल्लू अर्जुनची नेटवर्थ 350 कोटी तर प्रभासची नेटवर्थ 400 कोटी आहे. त्यामुळे जायद नेटवर्थमध्ये दोघांना मागे टाकतो 





Read More