चित्रपटांमध्ये ज्या थरारक आणि धडकी भरवणारे स्टंट्स आपण पाहतो. ते बहुतांश वेळा मुख्य कलाकार स्वत: करत नाहीत. या साहसी स्टंट्ससाठी 'स्टंट डबल्स' किंवा 'बॉडी डबल्स' वापरले जातात. जे कलाकारांप्रमाणेच दिसतात आणि त्यांच्या जागी हे स्टंट करण्याचे धाडस करत असतात. पाहूया काही बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या प्रसिद्ध स्टंट डबल्सची माहिती.
हृतिक रोशनचे अनेक अॅक्शन सिन प्रसिद्ध आहेत. 'विक्रम वेधा' या चित्रपटामध्ये मन्सूर अली खानने हृतिकच्या स्टंट डबलचे काम केले होते. तो अगदी हृतिकसारखा दिसतो आणि स्टंटमधील त्याचे कौशल्यही खूप चांगले आहे.
'सुलतान' चित्रपटात सलमान खानच्या काही कुस्ती आणि अॅक्शन सीनसाठी परवेज काझीने स्टंट डबल म्हणून काम केले होते. तो सलमान खानचा बराच काळ स्टंट डबल राहिला आहे.
जावेद एल बर्नी हा सलमानसाठी 'एक था टायगर' आणि इतर अनेक अॅक्शन चित्रपटात स्टंट डबल म्हणून काम केले. जावेदने या फ्रँचायझीमध्ये उत्तम काम केले आहे.
गीता टंडन ही प्रसिद्ध महिला स्टंट आर्टिस्ट असून, तिने हसी तो फसी मध्ये परिणीती चोप्रासाठी स्टंट डबल म्हणून काम केले. तसेच तिने दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि इतर अनेक अभिनेत्रींकरिताही स्टंट डबलचे काम केले आहेत.
प्रशांत वाल्डे हा शाहरुख खानचा बॉडी डबल आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखच्या जागी अनेक सिन्समध्ये काम केले आहे.
'ब्रह्मास्त्र' चित्रपटात शाहरुख खानच्या काही अॅक्शन सीनसाठी हसित सावनीने स्टंट डबलचे काम केले होते. हसित हा एक प्रशिक्षित स्टंट परफॉर्मर आहे. त्याने हॉलिवूडमध्येही काम केले अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
या स्टंट डबल्सच्या योगदानामुळेच कलाकारांना अॅक्शन सीन पूर्ण सुरक्षिततेने सादर करता येतात. त्यांनी धोका पत्करून चित्रपट अधिक प्रभावी बनवले. मात्र, त्यांना स्क्रीनवर फारसं क्रेडिट मिळत नाही.