रक्षाबंधनाच्या निमित्ताने, इंडस्ट्रीमधील पुढील पाच जोडपी जी चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसली आणि नंतर ती दुसऱ्या चित्रपटात भाऊ-बहिणीच्या भूमिकेतही दिसली.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नातेसंबंध क्षणात बदलतात आणि पडद्यावर त्याचं सुंदर चित्रणही होतं. ज्यामध्ये काही कलाकारांनी एका चित्रपट एकमेकांवर प्रेम केलं तर नंतर ते भाऊ-बहीण म्हणून दिसले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाहूयात अशा काही जोड्या ज्यांनी चित्रपटात एकमेकांवर प्रेम केलं तर दुसऱ्या चित्रपटात भाऊ-बहिणीचं गोड नातं रंगवलं आणि दोन्ही रुपांत प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं.
फिल्म 'जोश'मध्ये हे दोघे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसले तर 'मोहब्बतें' आणि 'देवदास'मध्ये ते प्रेमी म्हणून झळकले. दोन्ही नात्यांमध्ये त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडली.
'रेस 3' मध्ये सलमान खान आणि डेजी हे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसले. पण 'जय हो' मध्ये हीच जोडी रोमँटिक अवतारात प्रेक्षकांसमोर आली.
'बोल बच्चन'मध्ये अभिषेक बच्चन आणि असिन थोट्टूमकल हे दोघे भाऊ-बहिणीच्या नात्यात होते, तर 'ऑल इज वेल' मध्ये प्रेमी युगुल म्हणून झळकले.
'बाजीराव मस्तानी' आणि 'गुंडे'मध्ये रणवीर आणि प्रियंका या दोघांचा प्रेमाचा प्रवास दिसला. पण 'दिल धडकने दो'मध्ये त्यांनी भाऊ-बहिणीचं नातं साकारून प्रेक्षकांची मन जिंकली.
'ओम शांती ओम'मध्ये दीपिका पदुकोण ही अर्जुन रामपालची पत्नी होती. पण तेच दोघे 'हाउसफुल'मध्ये अर्जुन रामपालने दीपिकाचा मोठा भाऊ म्हणून भूमिका साकारली होती.
पडद्यावर नातं काहीही असो पण या कलाकारांनी प्रत्येक भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी छाप पाडून ओळख निर्माण केली आहे.