Ananya Panday Birthday : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनन्या तिच्या साधेपणामुळं आणि मनमिळाऊ स्वभावामुळंही चर्चेचा विषय ठरते.
'स्टुडंट ऑफ द इयर 2', या चित्रपटातून अनन्यानं हिंदी कलाजगतामध्ये पदार्पण केलं होतं. एका सेलिब्रिटी कुटुंबातील मुलगी असूनही सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला कारकिर्दीत अपयश मिळालं.
अनन्यानं कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून पदवी शिक्षण पूर्ण केलं पण, कलाजगतातील कारकीर्दीसाठी तिनं शिक्षण अर्ध्यावर सोडलं. वडिलांच्या प्रसिद्धीचा अनन्याला फार फायदा झाला नाही. अशा या अनन्याच्या कुटुंबातील एक सत्य कायमच चाहत्यांच्या भुवया उंचावतं.
अनन्या पांडे ही चंकी नव्हे, सुयश शरदची लेक आहे. यावर तुमचा तरी विश्वास बसेल का? कारण सुरुवातीपासून अनन्या पांडे अभिनेता चंकी पांडेचीच लेक असल्याचं सांगण्यात आलं.
आता तुम्ही म्हणाल हे सुयश शरद नावाचे गृहस्थ कोण? तर, चंकी पांडेचच खरं नाव आहे सुयश शरद पांडे. शरद हे चंकी पांडेचे वडील आणि मुंबईतील एक नावाजलेले हृदयविकार तज्ज्ञ.
वयाच्या 9 व्या वर्षापासूनच सुयश शरदला चंकी हे नाव मिळालं. तो अतिशय चुणचुणीत आणि धष्टपुष्ट असल्यामुळं अनेकांनीच त्याला या नावानं संबोधण्यास सुरुवात केली.
हिंदी कलाजगत, चाहते आणि अनेकांमध्ये त्याचं हेच नाव प्रचलित असलं तरीही मित्रमंडळी मात्र त्याला सुयश याच नावानं ओळखतात. अशा या सुयश शरदची लेक आहे अनन्या पांडे.
सध्याच्या घडीला अनन्या पांडे 72 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका चित्रपटासाठी ती साधारण 2 कोटी रुपये इतकं मानधन घेते. बसला ना धक्का?