PHOTOS

इतकी प्रसिद्ध अभिनेत्री की निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे, पण अहंकार नडला अन् करिअर उद्ध्वस्त झालं

1988 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केलेल्या या अभिनेत्रीला 1990 मध्ये एका चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण एका गोष्टीमुळे तिचं संपूर्ण करिअर उद्धवस्त झालं. 

Advertisement
1/7

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.  कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. रातोरात ही अभिनेत्री स्टार बनली. एका चित्रपटानंतर ती निर्मात्यांची पहिली पसंत बनली. 

2/7

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव अनु अग्रवाल आहे. या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या यशानंतर निर्माते तिला साइन करण्यासाठी पैशांनी भरलेली बॅग घेऊन येत होते. 

3/7

1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटातून अनुला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर अनु अग्रवालची कारकीर्द इतकी वेगाने वाढली की तिलाही विश्वास बसत नव्हता.

4/7

राहुल रॉयसोबतचा तिचा 'आशिकी'मधील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटातील गाणी देखील खूप प्रसिद्ध झाली होती. यानंतर तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. 

5/7

90 च्या दशकात जेव्हा मुली इतक्या उघडपणे पुढे येत नव्हत्या, तेव्हाही अनु अग्रवाल नायकापेक्षा जास्त फी घ्यायची. ती सर्वांसमोर सिगारेट ओढायची. स्वतः तिने एका मुलाखतीत हे उघड केले.

6/7

अनु अग्रवाल त्यावेळी अनेक चित्रपटांच्या ऑफरला नकार देयची. एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला मिळालेल्या प्रचंड यशानंतर तिच्यामध्ये प्रचंड अहंकार आला होता. 

7/7

मात्र, काळाने असा बदल केला की मुंबई सोडत असताना तिचा भयानक अपघात झाला. या अपघातानंतर ती कोमात गेली आणि तिची स्मृतीही गेली. त्यामुळे अभिनेत्रीची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. ती 28 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिली. 





Read More