बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जी 35 व्या वर्षी देखील सिंगल आहे. आजही तिने लग्नाचा कोणताही विचार केला नाहीये. पण योग्य व्यक्तीच्या शोधात आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या हटके लूकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अनेकदा तिने नातेसंबंधांबद्दल सांगितले आहे.
तिच्या मते, एखाद्या व्यक्तीने खूप दयाळूपणे वागणे हे महत्वाचे आहे. जेव्हा ती रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा ती खूप जाड होती.
प्रेम आणि लग्नाबद्दल बोलताना भूमीने सांगितले की, प्रेम म्हणजे योग्य व्यक्ती शोधणे आणि कोणतीही टाइमलाइन पूर्ण न करणे असं ती म्हणाली.
भूमी म्हणाली, मी नक्की लग्न करेन, पण योग्य व्यक्ती भेटल्यावर. कारण मला माझ्या आयुष्यात पुन्ही कधीही नाखूष नातेसंबंधात राहायचे नाही.
पुढे भूमी पेडणेकर म्हणाली की, मला अजिबात घाई नाहीये. पुढील 10 ते 20 वर्षात किंवा उद्या जरी मला योग्य व्यक्ती भेटली तर मी लग्न करेन.
मी रिलेशनशिपमध्ये आनंदात नसेल तर ते जपण्यात अर्थ नाही. त्यामुळे योग्य वेळ येताच मी लग्न करेन.