Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी करिअरपेक्षा संसाराला प्राधान्य दिलं. तर काही अभिनेत्रींनी मुलं आणि घरीची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं. या यादीत अनेक करिअरच्या शिखरावर असताना लग्नानंतर ब्रेक घेतला.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मोठमोठ्या अभिनेत्रींनी लग्नानंतर काम करणं सोडून दिलं. तर काहींनी लग्नानंतर पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तर काहीं कायमच्या दूर गेल्या
'टार्जन: द वंडर कार' आणि 'वॉन्टेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये फेम मिळवणारी आयशा टाकियाने करियरची सुरूवात या चित्रपटांपासून केली. आयशा टाकीयाचे लग्न फरहान आझमीशी म्हणजेच राजकीय नेते नेते अबू आझमी यांचा मुलसोबत झाले.मात्र लग्नानंतर आयशा चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे लांब गेली.
'गजनी' आणि 'रेडी' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये फेम मिळवणारी अभिनेत्री असीनने भरपूर चित्रपटांच्या ऑफर नाकारत वैवाहिक जीवनाला प्राधान्य दिलं. यानंतर असीन पुन्हा कधीच चित्रपटात दिसून आली नाही.
80 च्या दशकात 'राम तेरी गंगा मैली' या गाजलेल्या चित्रपटातून नाव कमवणारी मंदाकिनीने सुद्धा चित्रपटांच्या ऑफर नाकारत डॉनसोबत लग्न करून फिल्म इंडस्ट्रीला रामराम केलं.
अभिनेत्री नमृता शिरोडकरने सलमान खान आणि संजय दत्त यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 2000 च्या सुरूवातीला साउथ एक्टर महेश बाबूसोबत लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्री पूर्णविराम लावला.
90च्या दशकात फेम मिळवणारी सोनाली बेंद्रेने बऱ्याच कलाकारांसोबत काम केलं होतं. 2002 मध्ये लग्न केल्यानंतर सोनालीने काही वर्षांसाठी फिल्म इंडस्ट्री सोडली होती. त्यानंतर कॅन्सरवर मात करत तिने आता पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलाय.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सर्वांनाच माहितीय. 1999 मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्न करुन ती काही वर्षांसाठी अमेरिकेला स्थायिक झाली होती. त्यानंतर मुलं मोठी झाल्यानंतर ती पुन्हा भारतात परतलीय. माधुरीने आ जा नचले या 2008 मधील चित्रपटातून पुन्हा कमबॅक केलं.
22 वर्षीय सायराने बरेच हिट चित्रपट केले. त्याचवेळी तिने आपल्यापेक्षा मोठ्या 42 वर्षीय दिलीप कुमारसोबत लग्न केलं. त्यानंतर सायराने फिल्म इंडस्ट्रीकडे वळूनही पाहिलं नाही.
बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरने लहानपणीच चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करियर करण्यास सुरूवात केली होती. 21 वर्षाांच्या असताना त्यांनी ऋषि कपूरसोबत लग्न केलं. कपूर घराण्याची सून झाल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीचा रस्ता सोडला. पण आज त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक केलंय.