'मी निर्वस्त्र झाले..', चित्रपटातील त्या सीननंतर अभिनेत्रीने नवऱ्याला बोलावून घेतले होते सेटवर. कोण आहे ती अभिनेत्री?
बॉलिवूडमधील ही अभिनेत्री नेहमी साडीमध्ये दिसायची. ती कधीच कोणत्याही चित्रपटात डीप नेक ब्लाउज परिधान करत नव्हती.
तिने ठरवलं होतं की ती चित्रपटासाठी कधीच तिच्या मर्यादा ओलांडणार नाही. चित्रपटांबाबत तिने एक नियम बनवला होता. ज्यामध्ये ती कधीच छोटे कपडे घालणार नाही.
या अभिनेत्रीने ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं आहे. या अभिनेत्रीचे नाव मौसमी चॅटर्जी आहे. जिने अभिनयाद्वारे चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
एका मुलाखतीत त्यांनी दिग्दर्शकाच्या आग्रहामुळे तिला घाघरा आणि डीप नेक ब्लाउज घालावा लागल्याचं सांगितलं आहे. त्यावेळीचा अनुभव तिने शेअर केलाय.
मौसमी चॅटर्जी म्हणाल्या की, ते परिधान केल्यानंतर मला असं वाटलं की जसं मी नग्न झाले आहे. 'कच्चे धागे' या चित्रपटाच्या वेळी हा सीन घडला होता.
बॅकलेस ब्लाउज आणि शॉर्ट घाघरा परिधान केल्याने त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. त्या तिथेच रडू लागल्या. त्यांनी लगेच त्यांच्या नवऱ्याला फोन करून सेटवर बोलावले.
हे लोक माझे सगळे कपडे उतरवायला निघाले आहेत. कृपया मला कोलकाताला परत पाठव. मी इथे काम करू शकत नाही असं त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितले.
मौसमी यांना त्यांच्या नवऱ्याने समजावलं. ते म्हणाले की, या कपड्यांत काही वावगं नाही. ते त्या पात्राच्या गरजेनुसार आहेत. मौसमी यांनी फक्त कपड्यांमुळेच 'गुड्डी' चित्रपटाला नकार दिला होता.