अभिनेत्री पूजा हेगड़े अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने देखील प्रचंड चर्चेत असते. 13 ऑक्टोबर 2024 ला ती 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
पूजा हेगडेने साउथ सिनेमातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिचा पहिला चित्रपटाचे नाव 'मूगामूडू' होते.
अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीने सलमान खान आणि रणवीर सिंग सारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.
पूजा हेगडेच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायच म्हटलं तर अभिनेत्री 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालक आहे.
पूजा हेगडे चित्रपटांव्यतिरिक्त वेगवेगळ्या जाहिरातींमधून देखील प्रचंड कमाई करते. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
पूजा सध्या एका चित्रपटासाठी 4 कोटी रुपये मानधन घेते. तर जाहिरातींसाठी अभिनेत्री जवळपास 40 लाख रुपये मानधन घेते.
हैदराबादमध्ये एका आलिशान घराशिवाय पूजाकडे मुंबईत समुद्राभिमुख आलिशान अपार्टमेंटही आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.
मुंबईत समुद्रकिनारी अभिनेत्रीचे आलिशान अपार्टमेंट आणि हैदराबादमध्ये एक आलिशान घर देखील आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
पूजा हेगडे शेवटची सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. आता तिचा अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे.