त्राचा प्रसिद्ध सितार वादकासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे एकमेका...
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा नुकतीच प्रसिद्ध सितार वादक ऋषभ रिखीराम शर्मासोबत दिसली होती. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पाहिल्यानंतर सान्या आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकरी करत आहेत.
दोघांचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत. सान्या मल्होत्रा आणि ऋषभला एकत्र पाहून चाहत्यांनी देखील या जोडप्याचे खूप कौतुक केलं आहे.
सान्या मल्होत्रा ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
या फोटोंमध्ये सान्या आणि ऋषभ एका कार्यक्रमात सहभागी झाल्याच दिसत आहे. दोघेही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहेत.
ऋषभ शर्मा हा सितार वादक आणि गायक आहे. त्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर ऋषभ शर्माचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.