PHOTOS

'तो मागून आला आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला...', बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेला संतापजनक प्रकार

भूतकाळात आपल्यासोबत झालेल्या वाईट घटनांवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री खुलेपणाने बोलल्या आहेत. असाच एक वाईट अनूभव आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केलाय.

Advertisement
1/10
'तो मागून आला आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला...', बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेला संतापजनक प्रकार
'तो मागून आला आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला...', बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेला संतापजनक प्रकार

Bollywood Actress Molestation: भूतकाळात आपल्यासोबत झालेल्या वाईट घटनांवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री खुलेपणाने बोलल्या आहेत. असाच एक वाईट अनूभव आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केलाय. एकदा एका पुरूषाने तिचा विनयभंग केला होता. ही अभिनेत्री या घटनेने खूप घाबरली होती आणि तिने बराच काळ कोणालाही सांगितले नव्हते.

2/10
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घाणेरडे कृत्य
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घाणेरडे कृत्य

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री विनयभंगाच्या बळी ठरल्या आहेत. काहींना बालपणात हा कटू अनुभव आलाय तर काहींना प्रौढावस्थेतही तो अनुभव आलाय. अनेक अभिनेत्रींनी हे खुलेपणाने सांगितले. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर त्यांचे सर्व चाहते हैराण झाले.

3/10
बालपणात विनयभंग
बालपणात विनयभंग

आज आपण बालपणात विनयभंग झालेल्या एका अभिनेत्रीची कहाणी सांगणार आहोत. ही अभिनेत्री या गोष्टीला इतकी घाबरली होती की तिने ही गोष्ट अनेक वर्षे लपवून ठेवली. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिच्यासोबत काय घडले? सविस्तर जाणून घेऊया. 

4/10
सोनम कपूरचा 40 वा वाढदिवस
सोनम कपूरचा 40 वा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर 9 जून रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी सोनम कपूरचे चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.

5/10
चित्रपटांपासून स्वतःला केले दूर
चित्रपटांपासून स्वतःला केले दूर

सोनम कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिचे काम पसंत केले गेले आहे. पण आता सोनम कपूर चित्रपटांपासून दूर राहून तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय.

6/10
सोनम कपूरचे बालपणी शोषण
सोनम कपूरचे बालपणी शोषण

बालपणीत माझ्यावर अत्याचार झाला होता. 2016 मध्ये राजीव मसंदच्या शो दरम्यान घडलेला कटू अनुभव सोनम कपूरने सांगितला.

7/10
सोनम कपूर भावूक
सोनम कपूर भावूक

 

सोनम कपूरने तिच्यासोबत झालेल्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितले तेव्हा ती भावनिक झाली. 'त्या वेळी मी 13-14 वर्षांची असेन. एका मैत्रिणीचा वाढदिवस होता.'

8/10
चित्रपट पाहण्यासाठी गेली होती
चित्रपट पाहण्यासाठी गेली होती

'आम्ही सर्व मित्र रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा चित्रपट पाहण्यासाठी गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये गेलो होतो. सर्व मुली समोसे खरेदी करू लागल्या. आम्ही सर्व एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे होतो.'

9/10
सोनम कपूरचा प्रायव्हेट पार्ट पकडला
सोनम कपूरचा प्रायव्हेट पार्ट पकडला

मी सर्वात उंच होते म्हणून मी मागे उभी होते. मला आठवतंय की त्यावेळी मागून एक माणूस आला आणि माझा प्रायव्हेट पार्ट पकडला. काय झालं ते मला समजलं नाही आणि मी रडू लागल्याचे ती म्हणाली.

10/10
सोनम कपूर दोन वर्षे गप्प
सोनम कपूर दोन वर्षे गप्प

'मी शांतपणे थिएटरमध्ये गेली आणि चित्रपट पाहिला. मी हे 2 वर्षे कोणालाही सांगितले नाही. मला असं वाटलं की मी चूक केली आहे.' सोनम कपूर शेवटी म्हणाली.





Read More