Tamannaah Bhatia Net Worth: क्रिकेटर, बिझनेसमन किंवा सुपरस्टार यांच्यासोबत अनेक अभिनेत्री लग्न करतात. परंतु, एक अशी अभिनेत्री जिने 2 क्रिकेटपटूंना नकार देऊन एका फ्लॉप अभिनेत्यासोबत प्रेमात आहे. जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे 10-12 अफेअर असून देखील आता त्या सिंगल आहेत. पण काही अभिनेत्रींनी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत लग्न देखील केलं आहे.
आज आम्ही तुम्हाला एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिच्या अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
आम्ही तमन्ना भाटिया विषयी बोलत आहोत. जिने दोन क्रिकेटपटूंचे ह्रदय तोडले आहे. त्यानंतर ही अभिनेत्री एका फ्लॉप अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.
तमन्ना भाटिया नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आहे. ती बॉलिवूडमध्ये सहाय्यक भूमिका साकारणारा अभिनेता विजय वर्माच्या प्रेमात पडली होती.
तमन्ना भाटिया अनेक वेळा विजय वर्मासोबत दिसली आहे. विजय वर्माच्या आधी तमन्नाचे नाव विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबत जोडले होते.
परंतु तमन्नाने ही अफवा असल्याचं म्हटले आहे. विजय वर्माची संपत्ती ही विजय वर्मा पेक्षा जास्त आहे. रिपोर्टनुसार विजय वर्माची 2023 मध्ये 17 कोटी रुपये संपत्ती आहे.
रिपोर्टनुसार, तमन्ना भाटियाची एकूण संपत्ती ही 120 कोटी रुपये आहे. तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये फी घेते.