PHOTOS

उर्वशी रौतेलाने घेतली नवीन कार, भारतात फक्त 6 जणांकडे, किंमत..

उर्वशी रौतेलाने खरेदी केली नवीन कार. इतकी महागडी कार घेणारी उर्वशी ठरली पहिलीच भारतीय अभिनेत्री. 

Advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती नेहमी तिच्या सौंदर्य आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

2/7

तिच्या फॅशन सेन्सची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असते. अशातच ती तिच्या नवीन कारमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने एक महागडी कार खरेदी केली आहे. 

3/7

इतकी महागडी कार खरेदी करणारी उर्वशी रौतेला ही भारतातील पहिली अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्रीने 31 व्या वर्षी 12 कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. 

4/7

त्यासोबतच उर्वशी रौतेलाने इंन्स्टाग्राम फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत देखील स्थान मिळवले आहे. उर्वशीकडे अनेक कारचे कलेक्शन आहे. 

5/7

ज्यामध्ये BMW, मर्सिडीज बेंझ एस क्लास, फेरारी पोर्टोफिनो, ऑडी Q7 अशा अनेक कार तिच्याकडे आहेत. काही दिवसांपूर्वीच ती 'डाकू महाराज' चित्रपटात दिसली होती. 

6/7

या चित्रपटातील 'दबिडी दिबिडी' या गाण्यामुळे देखील तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. या गाण्यात तिने नंदामुरी बालकृष्णासोबत डान्स केला आहे. 

7/7

सोशल मीडियावर देखील उर्वशी रौतेला खूप सक्रिय असते. नेहमी चाहत्यांसाठी ती वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 





Read More