विद्या बालनला 'साडी क्वीन' म्हणून ओळखले जाते. आता एका मुलाखतीत विद्याने तिच्या कपाटात किती साड्या आहेत? याचा खुलासा केला आहे.
हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी विद्या बालनचे साडी प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. साडी हा तिचा अतिशय आवडता पेहराव आहे.
एखाद्या भव्य ॲवॉर्ड सोहळा असेल किंवा मग कोणताही छोटा कार्यक्रम ती साडी परिधान करण्याला प्राधान्य देते. तिच्या साड्यांचीही सर्वत्र चर्चा पाहायला मिळते.
विद्या बालनने आतापर्यंत कॉटनच्या साडीपासून कांजीवरम साडीपर्यंत अनेक साडींवर फोटोशूट केले आहे. पण आता विद्याने तिच्याकडे एकूण किती साड्या आहेत, याचा खुलासा केला आहे.
विद्या बालनने Unfiltered by Samdish या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या कपाटाबद्दल विचारणा करण्यात आली.
यावर ती म्हणाली, माझे कपड्यांचे कपाट इतर महिला आणि सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या तुलनेत आकाराने अजिबात मोठे नाही. पण मी एक मिनिमलिस्ट (minimalist) आहे. हे मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते.
माझ्या कपाटात खूप गोष्टी नाही. मला अनेकजण माझ्याकडे किती साड्या आहेत, याबद्दल विचारतात. पण मला त्यांना सांगावंस वाटतं की मी खूप साड्या परिधान करत असते.
माझ्याकडे फक्त 25 चं साड्या आहेत. ज्या तुमच्या कल्पनेपेक्षा खूपच कमी आहेत. यानंतर तिला इतक्या कमी साड्या असण्याचे कारण विचारले.
त्यावर ती म्हणाली, मी माझ्या साड्या इतरांना देत राहते. कारण मी त्या पुन्हा कधीच नेसणार नसते.
मी माझ्या साड्या इतरांना देते, कारण त्या ठेवून मी काय करणार? मी कोणतीही साडी एकदा घातल्यावर परत परिधान करत नाही. त्यामुळे माझ्या कपाटात ठेवलेल्या साड्यांशी भावना जोडल्या आहेत, असे विद्या बालनने म्हटले.